Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

सोबायबिन पिकांची नुकसान भरपाई सह विम्याचा परतावा द्या.तहसीलदारांना निवेदन – काँग्रेसची मागणी

सोबायबिन पिकांची नुकसान भरपाई सह विम्याचा परतावा द्या.तहसीलदारांना निवेदन – काँग्रेसची मागणी

MB NEWS (सुनिल घोरमाडे)तिवसा:-आधीच उत्पन्न घटत असल्याने शेतकरी हवालदिल झालं आहे तर दरवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पिक होईल या आशेवर शेतकरी होता परंतु निसर्गाच्या लहरीपना मुळे या वर्षी सुद्धा शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरवल्याचे चित्र तालुक्या दिसत आहे, मागील वर्षीच्या तुलनेत प्रथमतः पावसाने चांगली हजरी लावल्याने तालुक्यातील पिके चांगले दिसायला लागले होते त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होत्या.परंतु अचानक पावसामध्ये मोठा खंड पडल्याने सोयाबीन पिके सुकायला लागली होती,त्यात सोयाबीन पिके उध्वस्त करणारा मोझॉक नावाचा रोग तसेच उंटअळी सोयाबीन पिकांवर आक्रमण केल्यामुळे सोयाबीन पिके ही उभेच सुकत चालली आहे,त्यामुळे तालुक्यातील बऱ्याच सोयाबीन उत्पादनाक शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट होतांना दिसत आहे,त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चांगलाच आर्थिक संकटात सापडला असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचे मोठे आवाहन शेतकऱ्यान समोर उभे ठाकले आहे,त्यामुळे अशा परिस्तिथी मध्ये सरकारने शेतकऱ्यांच्यां पाठीशी असणे गरजेचे आहे त्यामुळे झालेल्या नुकसानाची प्रत्येक्ष पाहणी व पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदतीसह विम्याचा परतावा मिळण्यात यावा अशी मागणी तहसीलदार तसेच तालुका कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.यावेळी तिवसा पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रशेखर ठाकूर माजी सरपंच विलास हांडे माजी सरपंच मुकुंद पूनसे दीपक देशमुख-पावडे विजय करडे ज्ञानेश्वर गावणार राहुल लवणकर राधेश्याम महात्मे पुरूशोत्त्म तालन मंगेश पुनसे मयूर शिरपुरकर प्रशांत पुनसे यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे