Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

चांदुर रेल्वे बाजार समितीच्या आवारावर मुंग खरेदीचा शुभारंभ.. तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजार समिती कडुन आत्ता मिळत आहे शेतमालाला चांगले भाव…

चांदुर रेल्वे बाजार समितीच्या आवारावर मुंग खरेदीचा शुभारंभ.. तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजार समिती कडुन आत्ता मिळत आहे शेतमालाला चांगले भाव…

 

MB NEWS (चांदुर रेल्वे):-स्थानिक कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारावर आज दि. ०३/१०/२०२३ खाजगी व्यापारी यांचे वतीने मुंग खरेदीचा शुभारंभ सभापती मा.गणेश सि. आरेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बाजार समितीचे व्यापारी मोदी ट्रेडर्स तर्फे श्री. सचिन मोदी यांनी शुभारंभाचा मुग खुल्या लिलावमध्ये रु. ११,१११/- ही सर्वात जास्त बोली बोलुन मुंग खरेदी केला. शुभारंभाचा मान अमदोरी येथील शेतकरी श्री. वैभव तायवाडे याना मिळाला सदर शेतकन्यास, सभापती मा.गणेश सि. आरेकर तसेच उपस्थित संचालक यांनी शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले, तसेच वजन काटयाचे पुजन करुन शेतकऱ्यांनी आपली नविन हंगामातील शेतमाल जसे सोयाबिन, तुर, उडीद, मुंग व इतर शेतमालाला सुध्दा बाजार समितीच्या आवारावर चांगले भाव मिळत असल्यामुळे आपला शेतमाल विक्रीकरीता बाजार समितीच्या आवारावर आणावा असे आवाहन मा. सभापती महोदय यांनी केले.

या प्रसंगी बाजार समितीचे उपसभापती रविंद्र अ. देशमुख (जाधव) संचालक राजेंद्र श्री. राजनेकर, प्रभाकरराव ह. वाघ, रामेश्वर पं.वानखडे, रावसाहेब ह. शेळके, मंगेश श्री. धावडे, अतुल द चांडक, सौ.वर्षाताई प्र.वाघ, सौ.पुजाताई श्री. देशमुख, वसंता अ. गाढवे, तेजस ह. भेंडे, आशुतोष अ. गुल्हाणे, हरीभाऊ व. गवई, प्रशांत बा. कोल्हे, सुभाष मु. अग्रवाल, शामसुंदर मा. पनपालीया, सुरेश ना. जाधव व अडते, व्यापारी सुधिर गंगन, अनिल गांवडे, सचिन गंगन, नितीन गंगन, सतीष निरमुडे, राम टावरी, जयराज टावरी, गुनवंता आगासे, अक्षय पनपालीया, दयाचंदजी चांडक, सचिन झोपाटे, राजेंद्र वन्हाडे, विजय सराड, मनोज बगडते, विजय मानकानी, अमोल बन्हाडे, बा.स चे सचिव चेतन इंगळे, अभिजीत देशमुख किशोर शेळके, जगदीश माहुलकर, गजानन खडसे, अनंता पोलाड, तेसच शेतकरी बंधु व आदि मान्यवर उपस्थीत होते.

 

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे