Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तलाठी भरतीची महत्वाची अपडेट!! कधी लागणार निकाल अन् कधी मिळणार नियुक्ती? जाणून घ्या..!

तलाठी भरतीची महत्वाची अपडेट!! कधी लागणार निकाल अन् कधी मिळणार नियुक्ती? जाणून घ्या..!

💁🏻‍♂️ संपूर्ण राज्यात उत्सुकता लागून राहिलेल्या तलाठी भरती परीक्षेच्या निकालाविषयी एक महत्वाची अपडेट आहे. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या तलाठी परीक्षेचा निकाल लवकरच जाहिर होणार असून परीक्षेसाठी नमुना उत्तरपत्रिका तयार करण्यात आली असून, त्यावर उमेदवारांकडून हरकती मागविण्यात आल्या आहेत.

📝 *‘या’ तारखेपर्यंत नोंदवा हरकती*
परीक्षार्थींना उत्तरपत्रिकेबाबत हरकती नोंदविण्याची संधी दिली आहे. येत्या १६ ऑक्टोबरपर्यंत सर्व हरकती एकत्रित करण्यात येणार आहेत. हरकत नोंदविण्यासाठी १०० रुपयांचे शुल्क आकारण्यात आले आहे. एकत्रित केलेल्या हरकती या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या गटाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी ३१ ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम उत्तरपत्रिका जारी करण्यात येईल. त्यानुसार, उमेदवारांना परीक्षेत किती गुण मिळाले हे कळणार आहे; असे जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त तथा परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी सांगितले.

🧾 *१५ डिसेंबरला गुणवत्ता यादी जाहिर होणार*
तलाठी परीक्षेच्या निकालाची अंतिम गुणवत्ता यादी १५ डिसेंबरला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसिद्ध केली जाणार आहे. कागदपत्रांच्या पडताळणीसाठी पुढील महिनाभराचा कालावधी देण्यात येणार आहे. त्यानंतर दि. २६ जानेवारीला राज्यपालांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येतील; असेही आनंद रायते यांनी सांगितले.

✒️ *हरकतीचा विचार करुन उत्तरपत्रिकेत बदल होणार*
उमेदवारांनी घेतलेली हरकत योग्य असल्यास त्यानुसार उत्तरपत्रिकेत बदल करण्यात येणार आहे. हरकतीसाठी घेतलेले १०० रुपये शुल्क संबंधित उमेदवाराला परत करण्यात येईल. राज्यपालांच्या हस्ते २६ जानेवारी २०२४ला उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. त्यानंतर फेब्रुवारीत उमेदवारांना नियुक्तीची ठिकाणे निश्चित केली जातील..

📣 *_MB- न्यूजच्या_* माध्यमातून करा तुमच्या व्यवसायाची जाहिरात लाखो लोकांच्या वर आम्ही पोहचवितो तुमची जाहिरात आणि   मिळवा भरघोस प्रतिसाद… *_9850184190_*

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे