महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, रविराज देशमूख यांनी ओ. बी.सी. मोर्चा व जागर यात्रा भा.ज.पा. यांनी काढली असता.. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनतेचा कल भा. ज. पा कडे अशी चर्चा तिवसा विधानसभा क्षेत्रात सुरु आहे.

महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रविराज देशमूख, यांनी ओ. बी.सी. मोर्चा व जागर यात्रा भा.ज.पा. यांनी काढली असता..

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनतेचा कल भा. ज. पा कडे अशी चर्चा तिवसा विधानसभा क्षेत्रात सुरु आहे.

 

MB NEWS (तिवसा)सुनील घोरमाडे :-दिनांक 9/10/23 रोजी तिवसा येथे भव्य दिव्य सभे चे आयोजन केले होते.भारतीय जनता पार्टी तर्फे बाईक रॅली काढून ओ बी सी जागर यात्रे चे स्वागत केले.हि यात्रा पार्डी ते पोहरा देवी दिनांक 2 ऑक्टोंबर ते 12 ऑक्टोंबर पर्यंत चालणार आहे.या यात्रे चे उदिष्ट ओ बी सी समाजाला जागृत करणे आहे.माननीय श्री रविराज देशमूख आणि भारतीय जनता पार्टी तर्फे तिवसा मध्ये भव्य दिव्य स्वागत करून सभा घेतली.या सभेला भारतीय जनता पार्टी चे दिग्गज नेते उपस्थित होते.मान्यवरानि फोटो चे पूजन केले नंतर मान्यवरा चे पुष्प हार आणि शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.या सभेला लाखो नागरिक उपस्थित होते.या सभेला दिग्गज नेते उपस्थित पाहता तिवसा विधानसभेचे विद्यमान आमदार यांच्या समोर येणाऱ्या 2024 च्या विधानसभा निवडणुकी मध्ये रविराज देशमुख भा ज पा तर्फे आपली उमेदवारी लढवीणार असल्याची चर्चा सद्या तिवसा विधानसभेत जोरदार सुरु झाली आहे.

कॉग्रेस चे विद्यमान आमदार यांना भा ज प चे प्रतिस्पर्धी रविराज देशमुख तयार झाले आहे.ही ओ बी सी जागर यात्रा काढली असता सद्या तरी जनतेचा कल रविराज देशमुख कडे दिसत आहे. अशी चर्चा तिवसा विधानसभा क्षेत्रात सुरु आहे. या ओ बी सी जागर यात्रेला महाराष्ट्र प्रदेश ओ बी सी प्रभारी आमदार आशिष देशमुख,महाराष्ट्र प्रदेश भा.ज.पा. ओ बी सी अध्यक्ष संजय गाते, मा.श्री.खा.डॉ.अनिलजी बोन्डे साहेब,मा.आ.श्री.प्रतापजि अडसूळ,माजी खा.सुरेशजी वाघमारे,मा.आ.रमेशजी बुन्दिले साहेब,सौ.निवेदिता ताई दिघले,श्री.राजेशजी वानखडे,सौ.अर्चना ताई देहनकर,श्री.संजयजी हिगासपुरे हे उपस्थित होते.या सभेचे आयोजन श्री.रविराज देशमूख महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओ.बी. सी.मोर्चा भा.ज.पा. यांनी केले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे