Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

कपाशी पिकामध्ये कीड रोग व्यवस्थापन करणे गरजेचे शिवार भेटीतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन रिलायन्स फाऊंडेशन चा उपक्रम

कपाशी पिकामध्ये कीड रोग व्यवस्थापन करणे गरजेचे शिवार भेटीतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन रिलायन्स फाऊंडेशन चा उपक्रम

MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र)दर्यापूर:- रिलायन्स फाऊंडेशन शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. त्याच अनुषंगाने अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील नाचोना व चिंचोली शिंगणे शिवारातील शेतांना भेटी देऊन पीक पाहणी करून शेतकऱ्यांना कीड व रोग व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सध्या कपाशी पिकामध्ये गुलाबी बोण्ड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तसेच पांढरी माशी मोठ्याप्रमाणात आहे त्यासाठी करावयाचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे या प्रश्नाचे निराकरण करण्याचा उद्देशाने. रिलायंस फॉउंडेशन माहिती सेवा यांच्या मार्फत शिवार भेट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये डॉ राजेंद्र जाणे, कृषी तज्ञ यांनी शेतकऱ्यांना त्याच्या समस्यांविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन मनोज काळे, रिलायंस फॉउंडेशन व कार्यक्रम सहाय्यक सुमित मातीकाळे यांनी केले.

या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी मिळालेल्या माहिती चा आम्हाला निश्चित लाभ होईल असे सांगितले व शेतकऱ्यांनी व तज्ञांनी रिलायन्स फाउंडेशन च्या या उपक्रमाचे कौतुक केले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे