रिलायन्स फाउंडेशन व कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, सोलाप ह्यांचं संयुक्त विद्धमाणे जागतिक अन्न दिन youtube लाईव्ह कार्यक्रम आयोजन करून साजरा.
दरवर्षी 16 ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन साजरा केला जाते, संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (Food and Agriculture Organization, FAO) जागतिक अन्न दिन हा उपक्रम सुरू केला. 1981 मध्ये पहिल्यांदा जागतिक अन्न दिन साजरा केला गेला होता. या वेळेची संधी साधून रिलायन्स फाउंडेशन व कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, सोलापूर ह्यांच्या संयुक्त विद्धमाणे यूट्यूब लाईवच्या माध्यमातून जागतिक अन्न दिन साजरा करण्यात आला.
संतुलित आहार न घेतल्याने कुपोषनास सामोरे जावे लागते याबद्दल लोकांमध्ये जागरूक निर्माण करणे आणि ही समस्या कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचं काम जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने केले जाते. त्यामुळे जागतिक अन्न दिन हा महत्वाचा आहे. *त्या अनुषंगाने आज दिं.16/10/23 सोयाबीन पिकाची काढणी पश्चात व्यवस्थापन व प्रक्रिया उद्योग विषयी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता* या मध्ये सोयाबीनमध्ये कशा प्रकारे मानवास पोषक ठरू शकेल. यासाठी सोयाबीन सीड्स, सोयाबीन तेल आणि सोयाबीनपासून बनवलेले इतर पदार्थ आहारात असायला हवे. सोयाबीन खाण्यामुळे अनेक आरोग्य समस्यांपासून सुटका मिळू शकते. सोयाबीनमध्ये प्रोटिन्ससोबतच मिनरल्स, व्हिटॅमिन्सही असतात. ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रित राहते, मधुमेहींसाठी सोयाबीन खाणं सोयाबेन तेलाचे फायदे खूपच फायदेशीर ठरू शकते या बाबत कार्यक्रमास आज डॉक्टर दिनेश क्षीरसागर विषय विशेयज्ञ अन्नशशत्रज्ञ व तंत्राद्यान आणि प्रमुख पाहुणे डॉक्टर तनाजी वळकुनदे कार्यक्रम समन्वयक व विषय विशेषज्ञ पशू विज्ञान व दुग्धशास्त्र याचे मार्गदर्शन लाभले. *कार्यक्रमात बियाण्यातील ओलावा काढणी वेळी किती टक्के हवी, मळणी व साठवण तंत्रद्यान नियोजन, मळणी यंत्राचा वापर व सोयाबीन प्रक्रिया व अन्नप्रक्रिया व तसेच सोयाबीन पदार्थ, प्रक्रिया व उद्योग ह्यांची माहिती क्षीरसागर सरांनी सांगितली तसेच जागतिक अन्न दिन हा दिवस महत्वाचा का आहे , संतुलित आहार न घेतल्याने कशा प्रकारे आपले नुकसान होऊ शकते याबद्दल वळकुंडे सरांनी सविस्तर माहिती दिली.* ह्या कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्याचे शेतकर्यांनी प्रश्न सुद्धा विचारले व प्रश्नांचे निराकरण करण्यात आले.

