Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

कलावंत जगला तरच समाज टिकेल- आमदार अमोल मिटकरी..सिनेस्टार विजय गोखले नटश्रेष्ठ निळू फुले सिनेभूषण पुरस्काराने सन्मानित.

कलावंत जगला तरच समाज टिकेल- आमदार अमोल मिटकरी..सिनेस्टार विजय गोखले नटश्रेष्ठ निळू फुले सिनेभूषण पुरस्काराने सन्मानित.

MB NEWS(महाराष्ट्रातील बातमीपत्र)अमरावती:-  लोकं हसणं विसरले आहेत. गंभीरतेने जगणारी माणसं आज पाहायला मिळतात; मात्र रंगभूमीवर अभिनयाच्या माध्यमातून रसिकांच्या मनावरील तणाव दूर करणारे कलावंत मात्र दुर्लक्षित राहत आहेत. कलावंत हा समाजाचा आरसा असून, कलावंत जगला तरच समाज टिकेल, असे प्रतिपादन आमदार अमोल मिटकरी यांनी येथे केले.

विद्याभारती महाविद्यालयात नटश्रेष्ठ निळू फुले आर्ट फाउंडेशन, अकोलातर्फे आयोजित नटश्रेष्ठ निळू फुले स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षीय भाषणात बोलत होते. सिनेस्टार विजय गोखले हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते.‌ यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष नरेश गडेकर, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्रादेशिक कला विभागाचे प्रमुख भोजराज चौधरी, रंग मुद्रा थिएटरचे दिगंबर आमले, अमरावतीचे ज्येष्ठ नाट्यकर्मी गजानन संगेकर, भारती विद्यापीठ शैक्षणिक मंडळाच्या उपाध्यक्ष मिताली राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवस्तुती व नांदीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रारंभी सिनेस्टार विजय गोखले यांना नटश्रेष्ठ निळू फुले सिने भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविकाद्वारे ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. रमेश थोरात यांनी केले. कला ही समाजाला नवी दिशा देणारी असावी, त्यासाठी नवोदितांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन संजीवनी पुरोहित यांनी केले. संदेश वाचन ॲड. नितीन धूत यांनी केले. आभार सुधाकर गीते यांनी मानले.

निळु फुले यांनी सामाजिक बांधिलकी जपली- गोखले
पुरस्कार म्हणजे टोचणी असते. कर्तव्य पार पाडण्याची ती सदैव आठवण करून देते. मला मिळालेल्या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी वाढली आहे, असे सांगून डोक्यात हवा न जाऊ देता प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा चेहरा म्हणजे नटश्रेष्ठ निळू फुले होय. त्यांनी अभिनयासोबतच सामाजिक बांधिलकी जपली. त्याच ध्येयाने नटस्रेष्ठ निळू फुले आर्ट फाउंडेशन कार्य करीत असल्याचे गौरवोदगार सिनेस्टार विजय गोखले यांनी केले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे