Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) नगरीत “कार्तिक यात्रोत्सव”पंचक्रोशी, चंदन उटी, काकडा-समाप्ती,भव्य-महाप्रसाद, मांड-वाढवा, सेवाधारी भाविकांचा सत्कार इ. विविध कार्यक्रम.

श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) नगरीत “कार्तिक यात्रोत्सव”पंचक्रोशी, चंदन उटी, काकडा-समाप्ती,भव्य-महाप्रसाद, मांड-वाढवा, सेवाधारी भाविकांचा सत्कार इ. विविध कार्यक्रम.

MB NEWS (महाराष्ट्रातील बातमी )चांदुर रेल्वे:- तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक २७/११/२०२३ सोमवारला सकाळी ७.०० वाजता संस्थानच्या वतीने सर्व भाविक भक्तांचे उपस्थितीने भजनासह “पंचक्रोशीचे” कार्यक्रमाला संस्थानमधून प्रारंभ होणार आहे. दुपारी ४.०० वाजता संस्थानमध्ये “चंदन-उटी” कार्यक्रम, रात्री ७.०० वाजता चौघडा व आरतीनंतर भाविक भक्त व बाल गोपालसह “कार्तिक मास काकडा-समाप्ती”, रात्री ८.०० वाजता सर्व बाहेर गावातील भाविक भक्त व गावकरी मंडळी करिता “भव्य-महाप्रसाद” आयोजित करण्यात येणार आहे.

*दिनांक २८/११/२०२३ मंगळवारला सकाळी ९.०० वाजता संस्थानमध्ये “कार्तिक मास अखंड भजन मांड वाढवा” मुख्य मंदिरातून आरंभ होवून असंख्य भाविक-भक्तसह पूजा व भजनाचे गजरात लहान मंदिरातील बसविलेली ढाल उठवून मुख्य मंदिराचे सभा मंडपात मांडीचा वाढवा पंच आरतीने भाविकांना गुलाल लावून करण्यात येईल.यानंतर ज्या भाविकांनी या मांडी मध्ये दिवस पाळीत भजन व इतर सेवा दिली, अशा सेवाधारी भाविकांचा टोपी, शेला, कपडे व रोख रक्कम देवून विश्वस्त मंडळाचे हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.*
*तरी सर्व भाविक- भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.*

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे