Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

भिमटेकडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.आमदार यशोमती ठाकुर यांची ग्वाही

भिमटेकडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही.आमदार यशोमती ठाकुर यांची ग्वाही

MB NEWS तिवसा(प्रतिनिधी):-भगवान गौतम बुद्ध हे शांततेच प्रतीक होते.तिरस्कार करणाऱ्यावरही प्रेमच केलं पाहिजे हिचं शिकवण त्यांनी संपूर्ण विश्वाला दिली.त्याचं शिकवणीची कास धरण्याची सध्या गरज आहे. म्हणूनच अतिप्रांचीन असलेल्या कोडण्यपुर व भीम टेकडीच्या विकासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार यशोमती ठाकुर यांनी दिली. त्या कोडन्यपूर येथील प्रज्ञा शीलधम्म, भीम टेकडी सभागृहाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलतहोत्या.

.. यावेळी व्यासपीठावर आमदार बळवंत वानखडे, सभापती कल्पना दिवे, उपसभापती रोशनी पुनसे, माजी सभापती दिलीप काळबांडे, पूजा आमले, शिल्पा हांडे, प्रा पंकज वाघमारे, पं स सदस्य शरद वानखडे, अब्दुल सत्तार इसाक मुल्ला,निलेश खुळे, प्रेमदास राठोड,डॉ रामकृष्ण मिरगे, सुजाता पखाले, दिलीप वावरे, अरुण भोगे, धर्मा तेलमोरे, पृथ्वीराज मात्रे,मोहहंमद आरिफ आदी उपस्थित होते.

आमदार यशोमती ठाकुर पुढं बोलताना म्हणल्या कीं संविधान दिनाच्या दिवशी भिमटेकडीच्या विकासाचा पाया रचलाजातोय,हे विलक्षण अनुभूती देणारा दुग्धशर्करा योग आहे.इथल्या विकासासाठी निधी कमी पडू देणारा नाही अशीग्वाही देऊन त्या. पुढं म्हणाल्या कीं वडिलांच्या स्मृति प्रित्यर्थ आपण घुमट बांधून देणार असल्याचं त्यांनी यावेळी संकल्प केला. भिमटेकडी सोबतच इतरही धार्मिक स्थळ विकासासाठी आपण प्रयत्न करणार आहे.बंधूभावं, समानता, स्वातंत्र्य, हे कायम आबाधित राहवं हिचं काँग्रेस पक्षाची भूमिका होती,आहे,अन यापुढंही राहणार असल्याचं त्या म्हणाल्या.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे