Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

चांदुर रेल्वे तालुक्यातील जावरा (बग्गी )येथे भव्य कबड्डी सामन्याचे आयोजन  मागील आठ वर्षापासून छत्रपती शाहू महाराज क्रीडा मंडळाचा उपक्रम

चांदुर रेल्वे तालुक्यातील जावरा (बग्गी )येथे भव्य कबड्डी सामन्याचे आयोजन  मागील आठ वर्षापासून छत्रपती शाहू महाराज क्रीडा मंडळाचा उपक्रम

MB NEWS चांदुर रेल्वे :-मन ,मनगट ,मस्तकाला मजबूत ठेवणारा मातीतला खेळ म्हणजे कबड्डी , चांदूर रेल्वे तालुक्यातील जावरा ( बग्गी )या गावात मागील आठ वर्षाची परंपरा राखत यावर्षी सुद्धा जावरा येथील छत्रपती शाहू महाराज क्रीडा मंडळ च्या वतीने शनिवार 9 डिसेंबर पासून ५८ किलो वयोगटातील भव्य कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले ,
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा, प्रताप अडसड
, राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेश अध्यक्ष व जय हिंद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष डॉ, निलेश विश्वकर्मा राहणार आहे , तर प्रमुख पाहुणे म्हणून रामेश्वर घोडगे (ठाणेदार तळेगाव दशा) मिलिंद गुजरकर सरपंच जावरा डॉ, विलासराव गाढवे पोलीस पाटील जावरा हे राहणार आहे ,

मागील आठ वर्षापासून तालुक्यातील जावरा (बग्गी )येथे छत्रपती शाहू महाराज क्रीडा मंडळ च्या वतीने भव्य दिव्य असे कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात येत आहे , हीच परंपरा राखत मंडळा च्या वतीने या वर्षी सुद्धा कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे , यामध्ये भव्य स्वरूपाचे बक्षीस सुद्धा ठेवण्यात आले आहे , सध्या मंडळाच्या वतीने सामन्याची तयारी सुद्धा चालू आहे ,या ठिकाणी दरवर्षी सामने खेळण्याकरिता जिल्ह्यातून व आजू बाजू च्या तालुक्यातून चमू कबड्डी खेळण्याकरिता येतात, सामने खेळण्याकरिता आलेल्या चमु करीता मंडळाच्या वतीने राहण्यापासून तर जेवना ची सोय सुद्धा करण्यात येते ,

यावर्षी सुद्धा प्रेक्षकांना भव्य स्वरूपाचे सामने पाहण्यास मिळणार असून तालुक्यातील प्रेक्षकांनी सामने पाहण्याकरिता येण्याचे आव्हान मंडळाचे अध्यक्ष राहुल वरघट , मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे,

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे