Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

राज्यव्यापी संपामुळे शहरातील शासकीय- निमशासकीय कार्यालयाचे “कामकाज ठप्प”

राज्यव्यापी संपामुळे शहरातील शासकीय- निमशासकीय कार्यालयाचे “कामकाज ठप्प”

MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र)चांदूर रेल्वे:-

कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी,यासह इतर मागणीसाठी राज्य सरकारी-निमसरकारी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने गुरूवार (ता.१४) पासून बेमुदत संप पुकारलेला आहे.या संपात चांदूर रेल्वे शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सामील झाले. त्यामुळे राज्य शासनाचे सर्व कामकाज ठप्प पडले आहे.जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी १४ डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारला. या संपामध्ये चांदूर रेल्वे शहरातील तहसील कार्यालय,उपविभागीय अधिकारी कार्यालय,पंचायत समिती,तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांसह इतर सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सामील झाले. या संपामुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील शासकीय कार्यालय ओस पडले होते.तर सर्वसामान्य नागरिकांची कामे अडखडून पडल्यामूळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर हा संप सुरू राहून नागरीका याचा फटका बसणार आहे हे मात्र नक्की

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे