Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

रिलायन्स फाऊंडेशन व पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांचे लसीकरण शिबीर आयोजित

रिलायन्स फाऊंडेशन व पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांचे लसीकरण शिबीर आयोजित

सध्या हिवाळा सुरू आहे आणि थंडी वाढत असल्यामुळे जनावरांमध्ये आरोग्य संदर्भात विविध समस्या उद्भवतात. त्यामध्ये फऱ्या खुरकूत यासाठी जनावरांमध्ये लसीकरण करणे गरजेचे असते. वेळेवर लसीकरण न झाल्यास जनावरे दगावण्याची शक्यता असते. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या पशूंची काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग व रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर जिल्ह्यातील सावनेर या तालुक्यातील जलालखेडा या गावांमध्ये जनावरांचे लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. शिबिरामध्ये आजारी असलेल्या जनावरांवर उपचार करण्यात आले तसेच 150 हुन अधिक जनावरांना जंतनाशक लस, लाळ्या, खुरकूत, फऱ्या इत्यादींचे लसीकरण करण्यात आले. लसीकरण शिबिरामध्ये गावातील 40 ते 50 पशुपालकांनी आपली जनावरें उपचारासाठी आणली होती, ज्यामध्ये शेळ्या, गाई, बैल व म्हैस इत्यादी जनावरे होते. डॉ. सुनील बागडे पशु पर्यवेक्षक यांनी जनावरांवर उपचार करून लसीकरण केले. तसेच हिवाळ्यामध्ये आपल्या जनावरांची काळजी कशाप्रकारे घ्यायला पाहिजे, त्यांना चारा कुठल्या प्रमाणे द्यावा तसेच गोठ्याचे व्यवस्थापन कशा प्रकारे करावे, थंडी बसून त्यांचे संरक्षण कशा प्रकारे करावे यासंदर्भात संपूर्ण मार्गदर्शन डॉ सुनील बागडे यांनी केले. दुभत्या जनावरांना कशाप्रकारे खुराक द्यायला पाहिजे याविषयी सुद्धा त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक मनोज काळे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम सहाय्यक भूषण भक्ते यांनी परिश्रम घेतले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे