Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तिवसा तालुक्यातील शिवणगांव नजीक दुचाकी ट्रक वर आदळली मुलाचा जागीच मृत्यू,आई चा उपचारा दरम्यान मृत्यू

तिवसा तालुक्यातील शिवणगांव नजीक दुचाकी ट्रक वर आदळली मुलाचा जागीच मृत्यू,आई चा उपचारा दरम्यान मृत्यू

तिवसा (सुनिल घोरमाडे)प्रतिनिधी :-तिवसा तालुक्यातील अनकवाडी येथील दिनेश साबळे हा युवक आपल्या दुचाकीने अमरावती कडून येत असताना शिवणगांव उडान पुलावर उभ्या असलेल्या ट्रक ला दुचाकी ची मागून धडक बसल्याने दिनेश चा जागीच मृत्यू झाला तर त्याची आई बेबीताई प्रल्हादराव साबळे यांचा उपचारा दरम्यान अमरावती इरवीन दवाखाना मध्ये मृत्यू झाला.दि.19 जानेवारी दिनेश आपल्या आईला उपचारासाठी अमरावती येथील रुग्णालयात घेऊन गेला होता,परतीच्या प्रवासात शिवणगांव नजीक उभ्या असलेल्या कुटार घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम एच 40 एके 9595 ला दुचाकी क्रमांक एम एच 40 व्ही एन 7627 ची जबर धडक लागली. यामध्ये दिनेश प्रल्हादराव साबळे वय 52 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर त्याची आई बेबीताई बाय 72 वर्ष यांना घंभीर दुखापत झाली.त्यांना तातडीने आमदार यशोमती ठाकूर यांच्या रुग्णवाहिकेने अमरावती रुग्णलयात उपचारार्थ तातडीने दाखल केले. मात्र उपचाऱ्या च्या दरम्यान त्यांचा सुद्धा मृत्यू झाला.या घटनेचे वृत्त समजताच सर्वत्र हळ हळ व्यक्त होत असून त्यांचे मागे पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे