Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) नगरीत “पौष-मास यात्रोत्सव””चंदन उटी आणि रमणा, भव्य-महाप्रसाद, मांड-वाढवा,इ. विविध कार्यक्रम”

श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) नगरीत “पौष-मास यात्रोत्सव””चंदन उटी आणि रमणा, भव्य-महाप्रसाद, मांड-वाढवा,इ. विविध कार्यक्रम”

MB NEWS 365चांदुर रेल्वे :-चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक ९/२/२०२४ शुक्रवारला दुपारी ४.०० वाजता संस्थानमध्ये “चंदन-उटी आणि रमणा” कार्यक्रम,सायंकाळी ५.३० वाजता सर्व बाहेर गावातील भाविक भक्त व गावकरी मंडळी करिता “भव्य-महाप्रसाद” आयोजित करण्यात येणार आहे.*
*या महाप्रसादाचे अन्नदान दाते अवधूत सांप्रदायिक भाविक भक्त अनिल भा. राऊत, नागपूर यांचे स्व-खर्चाने आणि संस्थानचे अन्नदान समितीचे नियोजनात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा.*
*दिनांक १०/२/२०२४ शनिवारला सकाळी ९.०० वाजता संस्थानमध्ये “पौष मास अखंड भजन मांड वाढवा” मुख्य मंदिरातून आरंभ होवून असंख्य भाविक-भक्तसह पूजा व भजनाचे गजरात लहान मंदिरातील बसविलेली ढाल उठवून मुख्य मंदिराचे सभा मंडपात मांडीचा वाढवा पंच आरतीने भाविकांना गुलाल लावून करण्यात येईल.

ज्या भाविकांना संस्थानचे गोरक्षणातील गायी करिता चारा “दान” करावयाचा आहे, त्यांनी चारा पाठविण्यास संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन संस्थान तर्फे करण्यात येत आहे.
संस्थान तर्फे “गुढीपाडवा-यात्रा महोत्सव” नियोजन तयार करण्यात आले आहे.या मध्ये भाविकांना बसण्यासाठी भव्य-मंडप,दर्शन बारी नेट-मंडप आणि यामध्ये थंड पिण्याचे पाणी व्यवस्था,भाविकांसाठी भोजन-व्यवस्था,बाहेर गावावरुन येणाऱ्या अवधूत भजन मंडळांना जागा सुविधा,सेवाधारी आणि स्वयंसेवक यांचे मंदिर-नियोजन, संस्थानच्या विविध यात्रा महोत्सव समित्या, इत्यादी प्रकारचे नियोजन संस्थानचे वतीने या वर्षी करण्यात येणार आहे.

तरी सर्व भाविक- भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे