Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

रेशन दुकानदार धान्य देत नाही? विनाकारण त्रास देतोय? ‘इथे’ करा तक्रार..

 रेशन दुकानदार धान्य देत नाही? विनाकारण त्रास देतोय? ‘इथे’ करा तक्रार..

📙 बऱ्याचदा रेशन दुकानदार रेशन कार्डधारकांना धान्य देताना गडबड करतात. दुकानदार धान्य कमी देणे, धान्य कमी देऊन जास्त पैसे घेणे, नवीन रेशन कार्ड बनवून देण्यास टाळाटाळ करणे असे प्रताप करत असतात. त्यामुळे सामान्य नागरिक भरडला जातो. परंतू आता सामन्यांना दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे, जर रेशन कार्डवर स्वस्त धान्य मिळवत असताना कोणतीही समस्या उद्भवली, तर तुम्ही याबाबत थेट ऑनलाईन तक्रार करु शकता.

🌾 नागरिकांना सार्वजनिक अन्नधान्य वितरण यंत्रणेअंतर्गत गहू, तांदूळ, तेल आदी जीवनावश्यक अन्नधान्य स्वस्त दरात पुरवले जाते. मात्र काही रेशन दुकानदार ग्राहकांना वस्तू देण्यास टाळाटाळ करतात. काही वेळा धान्य ज्यादा दराने अन्य दुकानदारांना विकले जाते..

📞 यासाठी सरकारकडून आता प्रत्येक राज्यानुसार रेशन तक्रारींसाठी हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे जर तुम्हालाही जर रेशन कार्डवर कमी धान्य मिळत असेल किंवा डीलर विरोधात तक्रार असेल, नवीन रेशनकार्डसाठी अडचण निर्माण करत असेल, किंवा अनावश्यक पैशांची मागणी करत असल्यास चिंता करायचे कारण नाही. तुम्ही सरकारच्या टोल-फ्री क्रमांकावर घरबसल्या ऑनलाईन तक्रार करु शकता. ज्या तक्रारीची दखल थेट तहसील कार्यालयाकडून घेतली जाऊन कार्यवाही होईल. तसेच सरकारच्या वेबसाईटवरही तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.

 *इथे करा तक्रार..*
महाराष्ट्रात रेशन कार्ड संबंधित तक्रारीसाठी टोल-फ्री क्रमांक – 1967 / 1800224950
रेशन संबंधित तक्रारीसाठी ऑनलाईन वेबसाईट – https://mahafood.gov.in/pggrams/Entrygrv.aspx

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे