Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

लोखंडी कोयत्याने वार करून पेट्रोलपंप कर्मचाऱ्यास लुटले

लोखंडी कोयत्याने वार करून पेट्रोलपंप कर्मचाऱ्यास लुटले नऊ हजारांची रोकड घेऊन चोरटे पसार

सुनिल घोरमाडे तिवसा(प्रतिनिधी) – गुरुकुंज मोझरी नजीक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पेट्रोलपंप चालकाला मारहाण करीत त्याच्याकडील नऊ हजार, रुपयांची रोकड लुटण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान गुरुकुंज मोझरी नजीक अमरावती-नागपूर, राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कृष्णा पेट्रोलपंप येथे घडली याप्रकरणी तिवसा पोलिसस्टेशन येथे चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुकुंज मोझरी नजीक अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या

येथील संजय मोहोकार, यांच्या मालकीचा कृष्णा पेट्रोलपप येथे रात्री अचानक अकरा वाजताच्या सुमारास अज्ञात चार जण दुचाकीवर तोंडाला रुमाल बांधून आले. या चौघांनी येथे कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले किशोर गुल्हाने, तिवसा, यांना मारहाण करून व जवळ असलेल्या लोखंडी कोयते व शस्त्राचा धाक दाखवून यांच्याजवळील एकूण नऊ हजार रुपयांची रोख रक्कम व जवळ असलेला मोबाईल घेऊन हे चोरटे पसार झाले. सदर घटनेत पेट्रोलपंप रात्रपाळीतील कर्मचारी गुल्हाने, हे जखमी झाले असून पेट्रोलपंप वरील संगणकाची सुद्धा यावेळी तोडफोड करण्यात आली आहे. यातील आरोपी सी सी टीव्ही केमेऱ्यात कैद झाले असुम तिवसा पोलीस त्यांच्या मार्गावर असल्याचे दिसून येते.
यादरम्यान घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिस घटनास्थळी दाखल झाले व यासंदर्भात गुन्हाने यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिवसा पोलिसांनी कलम ३९४ अन्व्हये चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून यासंदर्भात अधिक तपास तिवसा पोलीस करीत आहे. दरोडे तसेच लुटमारीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून तिवसा पोलिसांनी घटनेतील आरोपींचा तपास करून शोध घ्यावा अशी मागणी येथील नागरीकांनी यावेळी केली आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे