Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

इयत्ता 10 वी बोर्डाच्या परीक्षेत विचारल्या गेलेल्या त्या संदीग्ध प्रश्नाला गुणदान झालेच पाहिजे…. शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा दावा..

इयत्ता 10 वी बोर्डाच्या परीक्षेत विचारल्या गेलेल्या त्या संदीग्ध प्रश्नाला गुणदान झालेच पाहिजे…. शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा दावा..

MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र) अतुल उज्जैनकर, विशेष प्रतिनिधी.अमरावती :- दिनांक 18 मार्च 2024 रोजी झालेल्या इयत्ता 10 वी बोर्डाच्या विज्ञान भाग – 1 विषयाच्या प्रश्नपत्रिकेत एक संधीग्ध प्रश्न विचारलला गेला होता ,हा एक प्रश्न असा होता कि ” सर्वात लहान अणूचे नाव लिहा”? पाठयपुस्तकानुसार ह्या प्रश्नाचे उत्तर ‘हेलिअम ‘ असे आहे परंतु काही संदर्भ ग्रंथामध्ये बघितले असता याचे उत्तर ‘हायड्रोजन ‘ असे देखील दिसत आहे त्यामुळे विद्यार्थि व पालकाच्या मनात ह्या संदीग्ध प्रश्नामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.त्या अनुषंगाने शिक्षक आमदार मा कपिल पाटील यांच्या पत्रावर कार्यवाही करत पुणे राज्य मंडळाने संबंधित विषयच्या विषयतज्ञाचे अभिप्राय घेतले,त्यांनी दिलेल्या अहवालानुसार वरील दोन्ही भिन्न उत्तराचा विचार करता व विद्यार्थी हिताच्या दृष्टीने उपरोक्त प्रश्नाचे उत्तर ‘हायड्रोजन’ किंवा ‘हेलियम’ ह्या पैकी काहीही लिहिले असता ते ग्रह्या धरून गुणदान करावे असा निर्णय मंडळाने घेतला असून समंधित विषयचे नियमांक व परीक्षक यांना उत्तरपत्रिका तपासणी बाबत सूचना देण्यात याव्या ह्या आशयचे पत्र राज्य सचिव अनुराधा ओक, राज्य मंडळ पुणे ह्यांच्या मार्फत 21 /3/2024 रोजी सर्व विभागीय मंडळाना निर्गमित करण्यात आले आहे..

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे