Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

22 वर्षाच्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या केली गोयंका येथील दुःखद घटना, नेमके असं काय घडलं?

22 वर्षाच्या युवकाची गळफास घेऊन आत्महत्या केली गोयंका येथील दुःखद घटना, नेमके असं काय घडलं?

MB NEWS (संतोष वाघमारे) धामणगाव रेल्वे :-गोयंका येथे राहणार नितीन सुधाकर गडपायले या 22 वर्षीय मुलाने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे. नितीन हा त्याच्या आई सोबत येथे राहत होता. आई घरगुती काम करण्यासाठी गेली असता, नितीन याने गळफास लावले चे सांगण्यात येत आहे .नितीन गडपायले हा गोयंका येथे राहत होता मंगळवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान घरामध्ये गळफास घेऊन त्याचा मृत्यू झाला आहे. दत्तापूर पोलीस यांना सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दत्तापूर पोलीस पोचले असून ,सदर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे पाठविण्यात आले आहे .गळफास घेण्याचे कारण अद्याप कळाले नसून पुढील तपास दत्तापूर पोलीस करीत आहे. नितीन च्या मृत्यूने परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे