Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

गुरुकुंज मोझरी येथे कोळशाचा ट्रक जळून खाक

गुरुकुंज मोझरी येथे कोळशाचा ट्रक जळून खाक

तिवसा (सुनिल घोरमाडे) प्रतिनिधी:– अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथून नजीकच असलेल्या विश्वमानव मंदिर दासटेकडी डवरगाव मार्गावरील आज दुपारी सुमारास कोळश्याने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे.ही घटना अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गापासून काही अंतरावरच असलेल्या डवरगावं मार्गावरील दासटेकडी येथे घडली आहे. ट्रक क्रमांक. एमएच 34 बी झेड 4325 हा 12 चाकी ट्रक चंद्रपूरच्या कोळसा खाणीतून 40 टन कोळसा घेऊन डवरगाव मार्गावरील इंडिया बुल्स कंपनीकडे जात असताना. डवरगाव मार्गावरील दासटेकडी परीसरात अचानक चालत्या ट्रकमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने. चालकाने प्रसंगावधान राखून ट्रक मार्गाच्या साईडला उभा केला यावेळी ट्रकमधून येत असलेला धूर वाढत असल्याचे पाहून ट्रकचालक तात्काळ बाहेर पडला. आण काही वेळातच ट्रकने पूर्णता पेट घेतला. नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत तिवसा नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला घटनास्थळी पाचारण केल व आग आटोक्यात आणण्यात आली

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे