Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तालुका माहेश्वरी संघटनेने उत्सहात साजरी केली महेश नवमी…विविध उपक्रम केले आयोजित…

तालुका माहेश्वरी संघटनेने उत्सहात साजरी केली महेश नवमी…विविध उपक्रम केले आयोजित…

MB NEWS (अतुल उज्जेनकर):– चांदूर रेल्वे तालुका माहेश्वरी संघटनेच्या वतीने चांदोली शहरांमध्ये महेश नवमीनिमित् स्थानिक राम मंदिरात भगवान उमा महेश यांची पूजा, अभिषेक महा आरती, त्यानंतर शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. भगवान महेशच्या सन्मानार्थ शहराचा मुख्य रस्तावर अश्वारूढ रथावर विविध फुलांनी पुतळा सजविण्यात आले होते या वेळीं शहर घोषणांनी दुमदुमले मिरवणुकीत माहेश्वरी महिला मंडळाच्या महिला, मुली, पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माहेश्वरी नवयुवक मंडळाच्या वतीने सर्व समाज बांधवांना घरोघरी जाऊन रोपांचे वाटप करून
वृक्ष संवर्धनाचा एक अनुभव संदेश समाजाला दिला तसेच त्यानंतर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना माहेश्वरी तरुणअध्यक्ष अतुल चांडक, सचिव मयूर मुंधडा, गोपाल पनपलिया, अक्षय पनपलिया, सचिन गंगण, कैलाश पनपलिया, सुधीर गंगण, आयुष गंगण, रूपेश मुंधडा, नितीन गंगन,रोशन चांडक, गोविंद पनपलिया, अमोल झंवर, राम मुंधडा, गोविंद टावरी, श्याम जाजू, श्याम टावरी, ओम टावरी, अमित राठी, गोकुळ पनपालिया आदींसह युवक यांच्या उपस्थित रुग्णांना फळ वाटप सुद्धा करण्यात आले.

महेश्वर महिला मंडळा ने स्थानिक सिंदी पंचायत धर्मशाळेच्या सभागृहात महेश्वर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, उमा-महेश यांच्यावर एकांकिका अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी समाजातील महिला उपस्थित होत्या.

माहेश्वरी संस्थेच्या वतीने हुशार विद्यार्थ्यांचा सत्कारमाहेश्वरी कुटुंबात ज्यांच्या आई-वडिलांचे वय 80 वर्षे आहे, त्या आई-वडिलांना अभिवादन देऊन आदर करण्यात आला आणि माहेश्वरी समाजातील 10 वर्षापासून किंवा त्यापेक्षा अधिक काळ संयुक्त कुटुंबात राहत आहे, अशा कुटुंबाना यावेळी सन्मानित करण्यात आले, तसेच समाज बंधूंचे अंतिम संस्कारात मदत करणाऱ्या युवकांचा यावेळी. उपस्थित पाहुणे महेशचंद्र करवा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणुन यवतमाळ येथून आलेले अखिल भारतीय महासभा कार्यगटाचे सदस्य महेश्वरी संघटनेचे चांदूर रेल्वेचे अध्यक्ष यांचा यावेळी सुद्धा सत्कार करण्यात आला , हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अध्यक्ष किशोर गंगन,उपाध्यक्ष राजेश मुंधडा, सचिव विजय कलंत्री, सहसचिव जयेंद्र टावरी, कोषाध्यक्ष दिलीप चांडक, संघटन मंत्री गोपाल पनपलिया, अमरावती जिल्हा माहेश्वरी संघटनेचे सदस्य राधेश्यामजी गांधी, डॉ.राजेश जाजू यांनी अथक परिश्रम घेतले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे