Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

शेत मजुरांना घेऊन जाणारा आटो वळण रस्त्यावर धडकला,तिवसा ते साशीं मार्गावरील घटना

शेत मजुरांना घेऊन जाणारा आटो वळण रस्त्यावर धडकला,तिवसा ते साशीं मार्गावरील घटना

MB NEWS (सुनिल घोरमाडे) प्रतिनिधी तिवसा :-तिवसा शहरापासून जवळच असलेल्या साशीं मार्गावरील शेती कामासाठी मजूर घेऊन जाणारा ऑटो समोर अचानक कुत्रा आडवा आल्याने अश्यातच आटो चालकाचे नियंत्रण सुटून साशीं येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या नालीवर येऊन धडकला या घटनेत आटोमधील एकुन दहा प्रवासी जखमी झाले आहे ही घटना . गुरुवार रोजी २५, तारखेला सकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली असून .

स्थानिक तिवसा शहरातील आटो क्रमांक एम. एच.२९.ए डी ७३३९ आज सकाळी सात वाजताच्या सुमारास गावातील शेतमजूर तिवसा येथून साशीं मार्गाकडे जात असताना अचानक मजुरांनी भरलेल्या भरधाव आटो समोर अचानक कुत्रा आडवा आल्याने आटो चालकाचे नियंत्रण सुटले व भरधाव आटो वळण रस्त्यावरून महामार्गाच्या कडेला जाऊन उलटला.त्यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी आटो मधील शेती कामाकरिता जाणारे पाच मजूर गंभीर जखमी झाले असून त्याना उपचारार्थ अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.
तर उर्वरित पाच किरकोळ जखमी मजुराना तिवसा येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. हे सर्व शेतमजुर तिवसा शहरातील असून यामध्ये आटो चालक योगेश कांनबाले, वय ४५ वर्षं, रोशनी सरर, ४०, वर्षे, सुनीता गौरखेडे,४३ वर्षे, अजु मुंदाने,४७ वर्षे सुनीता ढोक, ४४ वर्षे, रीना प्रवीण गोरडे, ४५ वर्षे सुनीता अरविंद मुंदाने, ४७ वर्षं सकुणाबाई गौरखेडे, ६०वर्षे, लीला गौरखेडे, ४०, वर्षे, रेखा गोरडे, ३१ वर्षे, यांच्यासह एकूण दहा प्रवासी जखमी झाले आहेत

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे