गोंदिया शहरातुन वाहणाऱ्या नालाच्या लगत असलेला घर कोसळल्याने एकाचा मृत्यू, तर एक जण बेपत्ता असल्याने शोधकार्य सुरू
MB NEWS गोंदिया (प्रतिनिधी ):-जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस आल्याने जिल्ह्याभरात पूर् परिस्थिती निर्माण झाली आहे. गोंदिया शहरातून वाहणाऱ्या नाल्याच्या लगत असलेल्या एक घर पाण्यात कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.. तर एक महीला घराखाली दबल्याची माहिती आहे.. महीलेचा शोध सुरू आहे…तर एक जण थोडक्यात बचावला आहे. दिपिन अग्रवाल (27) मृतकाचे नाव असून व किरण अग्रवाल (50) या खाली मलम्या खाली दबल्याची माहिती आहे.. तर अनिल अग्रवाल (52) हे यातून थोडक्यात बचावले आहेत. दीपिन अग्रवाल याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून.. किरण अग्रवाल यांचा शोध कार्य प्रशासनाच्या वतीने सुरू आहे.

