Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते लाखोंच्या विकास कामांचे भूमिपूजन

आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते लाखोंच्या विकास कामांचे भूमिपूजन

MB NEWS (अमरावती) :-भातकुली तालुक्यातील २८० लाखांच्या प्रलंबित विकास कामांना गती मिळाल्याने नागरिक सुखावले काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री व आमदार यशोमती ठाकूर यांनी भातकुली तालुक्यातील २८०लाखांच्या प्रलंबित विकास कामांना गती देत तालुक्यातील जळका, टाकरखेडा शम्भू , साऊर, रामा, पोहरापूर्णा, पूर्णा नगर, अंचलवाडी, निरूळगंगामाई,वाकी व ढंगारखेडा येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. यावेळी गाव-खेड्यातील विविध प्रलंबित विकास कामांना गती मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी यशोमती ठाकूर यांचे आभार मानले व पुढील कामांसाठी आशीर्वाद दिला.

शुक्रवार (ता.५) रोजी विविध मान्यवर व स्थानिक नागरिकांच्या लक्षणीय उपस्थितीत आमदार यशोमतीताई ठाकूर यांच्या हस्ते भातकुली तालुक्यातील जळका येथे ५२ लाख रुपये, टाकरखेडा शम्भू येथे २० लाख, साऊर येथे २० लाख, रामा येथे ६४ लाख, पोहरापूर्णा येथे ५३ लाख, पूर्णा नगर येथे ३४ लाख, अंचलवाडी येथे १० लाख, निरूळगंगामाई येथे २० लाख,वाकी येथे १७ लाखांच्या व ढंगारखेडा येथील १० लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी काँग्रेस नेते श्री. हरिभाऊ मोहोड, श्री. जयंतराव देशमुख, श्रीकांत बोंडे, अभय देशमुख, मकद्दर पठान, नरेंद्र मकेश्वर, अभय वंजारी, रेखाताई सरोदे, अंकुश जुनघरे, प्रदीप शेंडे, विजुभाऊ मकेश्वर, वैकुंठ देशमुख, गजानन लांजेवार, गजुभाऊ ठाकूर, सलिमभाई, आबिदभाई, प्रभाकरराव धंदर, संजय खोडस्कर, दिलीप डहाके, मनिष देशमुख, दिलीप म्हस्के व नागरिक तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे