तालुक्यातील सर्व पांधन रस्त्याची कामे तात्काळ सुरु करण्याबाबत निवेदन सादर

तालुक्यातील सर्व पांधन रस्त्याची कामे तात्काळ सुरु करण्याबाबत निवेदन सादर

MB NEWS (सुनिल घोरमाडे) प्रतिनिधी :-येत्या 14 ऑक्टोबर ला पोलीस स्टेशन समोर मनसे व शेतकऱ्याचे एक दिवशीय धरणे आंदोलन*
तिवसा-तिवसा तालुक्यातील सर्व पांधन रस्त्याची कामे तात्काळ सुरु करण्याबाबत आज दि.10 ऑक्टोबर 2024 रोजी तिवसा तहसीलदार,गट विकास अधिकारी तथापोलीस स्टेशन निवेदन सादर करण्यात आले असून येत्या दि 14 ऑक्टोंबर 2024 रोजी एक दिवशीय धरणे आंदोलन मनसे व शेतकरी पोलीस स्टेशन समोर करणार आहेत.तिवसा तालुक्यातील पांधन रस्ते अत्यंत खराब असून रस्त्याच्या दोन्ही बाजूस झाडे,झुडपे वाढलेली आहेत,पावसाळ्यात अनेक ठिकाणी चिखल होतो,रस्त्याने पाणी साचले राहते.त्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास सहन करून आपल्या शेतीची कामे करावी लागतात.सदर शेतकरी पांधन रस्त्याची कामे कधी मार्गी लागणार या प्रतिक्षेत आहे.शेतीचा हंगाम सुरु असून बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना वहीवाट करणे,शेतीची मशागत करणे त्रासदायक झालेले आहे.आज घडीला सर्व शेतकऱ्यांना आपले शेतीची मशागत करण्यापासून ते उत्पन्न घरी आणण्यापर्यंत खूप अडचणीना सामना करावा लागतो.प्रामुख्याने शेतात जाणारे सर्व पांधन रस्ते अरुंद आहेत.त्यामुळे अनेक ठिकाणी आर्थिक बाबीचा तुटवडा होतो.मुळात ती शिव पांधन आहे परुंतु काही लोकांनी त्या रस्त्यावर अतिक्रमण केले असल्याने बैलबंडी सुद्धा पांधन रस्त्याने ये जा करता येत नाही.त्यामुळे शासनाने यंत्रणा वापरून पांधन मोकळे करून रस्त्याचे खडीकरन करून द्यावे व तिवसा तालुक्यातील पांधन रस्त्याचे प्रश्न मार्गी लावावा असे मनसे संघटना व शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले.अनेक वेळा निवेदन दिले असता अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारे अंबलबजावणी झाली नसल्याने दि.14 ऑक्टोंबर 2024 रोजी तिवसा पोलीस स्टेशन समोरील खुल्या जागेत एक दिवशीय धरणे आंदोलन मनसे व शेतकरी करणार आहेत.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे