Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

ग्रामिण भागामध्ये विश्वकर्मा यांना जबरदस्त प्रतिसाद नारीशक्तीनी हातात घेतला गॅस सिलेंडर

ग्रामिण भागामध्ये विश्वकर्मा यांना जबरदस्त प्रतिसाद नारीशक्तीनी हातात घेतला गॅस सिलेंडर

MB NEWS (चांदुर रेल्वे) – वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांची प्रचार एक्सप्रेस ग्रामीण भागात सुसाट वेगाने धावत आहे .प्रत्येक गावात त्यांचे आत्मीय स्वागत होत असून नारीशक्तीने तर हातात गॅस सिलेंडर घेऊन त्यांचे निवडणूक चिन्हाचा अभूतपूर्व पद्धतीने प्रचार सुरू केलेला आहे.
डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांच्या प्रचाराचा झंजावात शिवनी, धानोरा माळी ,राजुरा ,बोरी या गावात दिसून पडला. शेकडो समर्थक आणि कार्यकर्त्यांसोबत डॉक्टर निलेश विश्वकर्मा आपली भूमिका स्पष्ट करत आहे .वंचित बहुजन आघाडी कडून आपली उमेदवारी का हे प्रत्येक मतदारांना पटवून सांगत आहे. प्रस्थापितांच्या विरोधात आपली लढाई का ,विकास ग्रामीण भागात का पोहोचला नाही, आजही धामणगाव रेल्वे मतदार संघ मागासलेला का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ते मतदारांना देत आहे. मतदारही त्यांच्या ओजस्वी आणि प्रभावी भाषणाने भारावून जात आहे .ग्रामीण भागात सुरू असलेल्या प्रचारा दरम्यान धानोरा माळी येथील किरण साळुंखे ,नंदू चोपडे ,विठोबा भगत ,अंकुश ढोबळे ,भास्कर गडलिंग, मानसिंग पवार, विशाल पवार, सुरेश साळवे ,धानोराचे मनोहर मेश्राम ,छोटू खान, दिलीप निंभोरकर, उमेश मेश्राम, शाम कमलकर ,राजेश मानकर, सुरज पिंपळकर, अब्दुल परवेज, मोहन ओके ,सतीश लोहकरे, गजानन दरवाई ,मंगेश कोरडे, सागर उभे कर मंगेश भलावी गजानन साळवे ,सुनील गुजर, भूषण रोहनकर, मोहन धानोरकर आदी प्रमुख कार्यकर्ता सहभागी होत आहे. डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांची दिनचर्या सकाळ पासूनच मतदारांच्या आणि युवकांच्या गाठीभेटीने होत आहे, त्यानंतर ते नारीशक्तीचा आशीर्वाद घेतात.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे