Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमास प्रारंभ.

‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमास प्रारंभ.

MB NEWS चांदुर रेल्वे,प्रतिनिधी (अतुल उज्जैनकर):–महाराष्ट्र राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये ‘ वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम १ जानेवारी २०२५ ते १५जानेवारी २०२५ पर्यंत राबविण्यात येणार आहे .ह्याच धरतीवर स्थानिक हुतात्मा भाऊगीर वाचनालय येथे दिनांक २ जानेवारी पासून ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा ‘ ह्या कार्यक्रमाला सुरुवात झाली .आज सकाळी १० वाजता हुतात्मा भाऊगीर वाचनालय येथे ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ एस आर रंगनाथन यांच्या प्रतिमेला हारर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला शहरातील वाचन प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध पुस्तकांचे वाचन केले व ह्या दिवशी वाचनालय संपूर्ण दिवस सुरू ठेवून ‘ वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ ह्या उपक्रमाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास प्रयत्न केले. तसेच १जानेवारी ते १५ जानेवारी पर्यंत हुतात्मा भाऊगीर वाचनालयामध्ये ग्रंथ प्रदर्शनी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन , लेखन व वाचन स्पर्धा, लेखक व वाचक यांच्यामध्ये संवाद, सामुहिक वाचन वाचन, कौशल्य कार्यशाळा व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करणे या प्रकारचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे अशी माहिती हुतात्मा भाऊगीर वाचनालयाचे अध्यक्ष शिट्टु उर्फ निलेश सूर्यवंशी, बच्चू उर्फ प्रमोद हरगोविंद वानरे व सतीश बेलसरे यांनी दिली, तसेच ह्या उपक्रमाचा शहरातील वाचन प्रेमींनी तसेच विद्यार्थी वर्गानी लाभ घ्यावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. ह्या कार्यक्रमाला सुधीर वाढोनकर, अजय हजारे ,मंगेश भोसले ,आकाश चांदुरे, बळवंत नागणे , पांडूभाऊ सावरकर, दिलीप मोटवानी ,लखन मोटवानी ,अमोल गुल्हाने तसेच शहरातील वाचन प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे