Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

अमरावती जिल्हा बांधकाम कामगार संघटना, सिटू चे धरणे आंदोलन यशस्वी..मोझरी येथील बांधकाम कामगारांना ग्रामसेवक यांच्याकडून मिळणार ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र

अमरावती जिल्हा बांधकाम कामगार संघटना, सिटू चे धरणे आंदोलन यशस्वी..मोझरी येथील बांधकाम कामगारांना ग्रामसेवक यांच्याकडून मिळणार ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र

MB NEWS (सुनिल घोरमाडे) तिवसा -महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगाराकरिता विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. या करिता नोंदणी व नूतनीकरण करण्याकरिता शासकीय अधिसूचनेनुसार बांधकाम कामगारांना ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामविकास अधिकारी/ ग्रामसेवक यांच्यामार्फत सही, शिक्का व जावक क्रमांकासह प्रमाणित करून उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे. या करिता आपल्या वरिष्ठ कार्यालयामार्फत उपरोक्त संदर्भीय पत्राद्वारे सन्माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याला आदेश निर्गमित केले आहे.
करिता मोझरी गावातील बांधकाम कामगारांच्या अर्जाची त्यांच्या कामाची पडताळणी करून बांधकाम कामगारांना ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवक यांनी सही, शिक्का व जावक क्रमांकासह प्रमाणित करून उपलब्ध करून देण्यात यावे अशा आशयाचे पत्र अमरावती जिल्हा इमारत बांधकाम कामगारसंघटना सिटूच्या वतीने मोझरी ग्रामपंचायत कार्यालयाला तीन महिन्यांपूर्वी सादर केले होते. यावर मोझरी ग्रामपंचायत ग्रामसेवक सुरेश झोलेकर यांनी कुठलीही कार्यवाही केली नसल्याने मोझरी गावातील बांधकाम कामगारांना ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी मोझरी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज दि- ०८/०१/२०२५ सकाळी ११.०० वाजता पासून मोझरी गावातील सर्व बांधकाम कामगारांच्या वतीनेसंघटनेने बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते या आंदोलनात शेकडो बांधकाम कामगार सहभागी झाले होते. यावेळी पंचायत समिती तिवसाचे सहायक गटविकास अधिकारी हेमंत निवल, ग्रामसेवक युनियनचे जिल्हा प्रतिनिधी श्री. मोंढे, तालुका अध्यक्ष संजय बडाशे, मोझरीचे ग्रामसेवक सुरेश झोलेकर, मोझरीचे सरपंच सुरेन्द्र भिवगडे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मोझरी गावातील बांधकाम कामगारांना ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ग्रामसेवक यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येईल अशी लेखी हमी दिली व लवकरच यावर कार्यवाही सुरू होईल असे सांगितले. या आंदोलनाला बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा सचीव अंकुश वाघ, उपाध्यक्ष ओमप्रकाश वाघमारे, जिल्हा कमिटी सदस्य रोशन कांडलकर, संतोष निमकर, शफिक शहा, समीर शेख, अभिजीत भेलकर यांच्यासह शेकडो बांधकाम कामगार उपस्थित होते .

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे