Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

तळेगाव दशासर येथे घराला भीषण आग आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळून राख

तळेगाव दशासर येथे घराला भीषण आग आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळून राख

MB NEWS संतोष वाघमारे :तळेगाव दशासर येथे घराला भीषण आग लागल्याने घरातील सर्व साहित्य जळून राख झाल्याची घटना घडली आहे .वसंत चंपतराव काटकर यांचे घराला बुधवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आग लागली .त्या आगीमध्ये घरातील सर्व साहित्य जळून राख झाले. आग पाहताच सामाजिक कार्यकर्ते संजय सारवे यांनी समय सुचकता दाखवीत लगेच सदरची माहिती धामणगाव येथील अग्निशामक दलाला दिली .माहिती मिळताच धामणगाव रेल्वे येथील अग्निशामक दलाचे टीम लीडर सचिन कट्यारमल व फायरमन संतोष आत्राम ,सतीश उईके, प्रशांत रोकडे ,हेमंत कापसे घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रित केले. मात्र तोपर्यंत काटकर यांचे घर पूर्णतः जळून राख झाले होते. घटनास्थळी नायब तहसीलदार वीर यांनी तलाठी सह पोचून घटनेचा पंचनामा केला .सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे