Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगनादेशामुळे तळेगाव ठाकुर सरपंच पुन्हा कायम!

सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगनादेशामुळे तळेगाव ठाकुर सरपंच पुन्हा कायम!

MB NEWS :(सुनिल घोरमाडे) :– तिवसा पंचायत समिती,तालुका तिवसा ग्राम तळेगाव(ठाकुर) सरपंच दर्शना नंदू मारबदे(पिढेकर) यांनी अपात्रते च्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असता सर्वोच्च न्यायालयाने आयुक्तानी दिलेल्या अपात्रतेच्या निकालावर स्थगनादेश दिल्याने सरपंच पदी पुन्हा दर्शना मारबदे कायम झाल्या आहे.
दर्शना मारबदे यांचे वर शासकीय जागेवर अतिक्रमण प्रकरणी अमरावती आयुक्त यांनी अपात्रतेचा निकाल दिला होता व त्यानंतर सरपंच उच्च न्यायालयात नागपूर खंडपिठात प्रकरण दाखल झाले होते त्यावर जानेवारी 2025 रोजी उच्च न्यायालयाने आयुक्त अमरावती यांचा निकाल कायम असल्याचा निर्वाळा दिला होता त्यानुसार सरपंच दर्शना मारबदे यांचे पद गेले प्रकरणी सरपंच गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली व प्रकरण दाखल झाले.सर्वोच्च न्यायालयाने सात फेब्रुवारी 2025 रोजी न्यायालयाने आयुक्तालयाचा निर्णय रद्दबाबत ठरवून स्थगनादेश दिल्यामुळे तसे आदेश खंड विकास अधिकारी पंचायत समिती तिवसा यांना प्राप्त होताच दि.12 फेब्रुवारी 2025 रोजी पुन्हा सरपंच पदाचा पदभार दर्शना पिढेकर(मारबदे) यांनी स्वीकारला असला तरी ग्रामपंचायती च्या राजकारणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन दाद मागितल्याची ही जिल्ह्यात पहलीच ऐतिहासिक घटना असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे