Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

चला जाऊया गाव ‘खेड्याकडे – या अभियानाला सुरवात.!ग्रामस्वच्छता व सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन.!

चला जाऊया गाव ‘खेड्याकडे – या अभियानाला सुरवात.!ग्रामस्वच्छता व सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन.!

MB NEWS (सुनिल घोरमाडे)–तिवसा.अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ,श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी द्वारा संचालित केंद्रीय प्रचार विभाग अंतर्गत तालुका प्रचार विभाग तिवसाच्या वतीने आयोजित ११६ व्या ग्रामजयंती निमित्त,तालुका सेवाधिकरी श्री.गणेशजी घाटोल यांच्या संकल्पनेतून चला जाऊया गाव-खेड्याकडे या अभियानाला गत सात वर्षापासून सुरवात करण्यात आली,त्याच धर्तीवर आज वं.राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे दर्शन घेऊन तालुक्यातील फत्तेपूर गावापासून या अभियानाला मोठ्या उत्साहात सुरवात करण्यात आली,राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मदिवस ” ग्रामजयंती ” म्हणून संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो,या महोत्सवाचे औचित्य साधून वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संकल्पनेतून वं.महाराजांच्या विचाराचा प्रचार-पसार व्हावा दृष्टीने अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाअंतर्गत,दरवर्षी निवडक १५ गावामध्ये ही मोहीम राबविण्यात येते.तालुक्यातील प्रत्येक गावातील जाती धर्म-पंथ-संप्रदायाचे लोक एकत्र यावे सोबतच ग्रामनिर्माण व ग्रामविकास साधून सामाजिक ऐक्य वृद्धिंगत व्हावे या दृष्टीने ” चाल गाव खेड्या कडे जाऊ या ग्रामजयंती साजरी करू या ” या अभियानाला काल तालुक्यातील फत्तेपूर जावरा येथून सुरवात करण्यात आली असून,बुधवार दिनांक ०९/०४/२५ रोजी नमस्कारी,शुक्रवार दि.११/०४/२०२५ रोजी काळागोटा,रविवार दिनांक १३/०४/२०२५ रोजी सूलतानपुर,सोमवार दिनांक १४/०४/२०२५ रोजी हस्नापुर,मंगळवार दिनांक १५/०४/२०२५ रोजी दिवाणखेड, गुरवार दिनांक १७/०४/२५ रोजी चिखली,शुक्रवार दिनांक १८/०४/२५ रोजी वंडली,शनिवार दि.१९/०४/२५ रोजी आखतवाडा,सोमवार दिनांक २१/०४/२०२५ रोजी शिंदवाडी,मंगळवार दिनांक २२/०४/२५ रोजी वाढोना,बुधवार दिनांक २३/०४/२५ रोजी मसदी,शुक्रवार दिनांक २५/०४/२५ रोजी विरगव्हाण,शनिवार दिनांक २६/०४/२०२५ रोजी कौडण्यपुर,रविवार दिनांक २७/०४/२०२६ रोजी मारडा येथे अभियान राबविण्यात येणार आहे, प्रथमतः काल फत्तेपूर गावापासून या अभियानाचा शुभारंभ करून सामूहिक ग्रामस्वच्छता व सामुदायिक प्रार्थनेचे भव्य आयोजन करण्यात आले होते.यावेळी ग्रामजयंती लेखाचे वाचन,प्रकाश दारोकर यांनी केले,दत्तायत्रे तिजारे यांनी सामुदायिक प्रार्थनेवर आपले विचार व्यक्त केले.तर गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक मुकूंद पूनसे यांनी ग्रामजयंती संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले,यावेळी सरपंच दिनेश लांडगे यांनी आपल्या समारोपीय भाषनामध्ये आभार पुष्प अर्पण करत सेवामंडळाची शाखा स्थापन करण्यासंदर्भात सहकार्य केले,यावेळी तालुका सेवाधिकारी गणेश घटोळ,केंद्र सेवाधिकारी छत्रपती राणे,राजेंद्र क्षीरसागर,आर्यन दाळू, कमलकिशोर दरेकर,आदित्य ढेंगे,जगन्नाथ साबळे, अमर साखरे, नेताजी केने,मनोहर सोमराळ,पोलीस पाटील रवी मोकद्दम यांचे विशेष सहकार्य लाभले,सामुदायिक प्रार्थनेकरिता महिलाभगिनी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे