Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

अहिल्याबाई होळकर गौरव अभियान व दहा कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत प्रा. सौ उत्तराताई वीरेंद्र जगताप यांचा प्रेरणादायी वाढदिवस साजरा..!

अहिल्याबाई होळकर गौरव अभियान व दहा कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत प्रा. सौ उत्तराताई वीरेंद्र जगताप यांचा प्रेरणादायी वाढदिवस साजरा..!

MB NEWS (चांदुर रेल्वे)- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर गौरव अभियान व दहा कोटी वृक्ष लागवड या कार्यक्रमांतर्गत सिग्नेचर क्लब, राष्ट्रीय सेवा योजना व वूमेन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने अतुल विद्या मंदिर वर्धा संस्थेच्या अध्यक्षा प्रा. सौ.उत्तराताई वीरेंद्र जगताप यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालय परिसरात त्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पराग वडनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरातील मोकळ्या जागांमध्ये विविध प्रकारची फळझाडे व औषधीयुक्त झाडांची लागवड करण्यात आली. यादरम्यान पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सर्व उपस्थितांनी वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला. याप्रसंगी मान्यवरांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून दिले.
प्रा. सौ उत्तराताई जगताप यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी पुस्तके भेट दिली तसेच श्रीनिवास भाऊ सूर्यवंशी यांनी सुद्धा पुस्तके ग्रंथालयात भेट म्हणून दिली. या कार्यक्रमाला अतुल विद्या मंदिर संचालित राजर्षी शाहू सायन्स कॉलेज, राजर्षी शाहू विज्ञान व अतुल जगताप कनिष्ठ महाविद्यालय,राजर्षी शाहू इंग्लिश स्कूल चांदूर रेल्वे येथील प्राध्यापक वृंद ,शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. गजानन संतापे, वुमेन सेलच्या समन्वयक व सिग्नेचरच्या सह समन्वयक डॉ. संपदा पाथरकर यांनी केले. याप्रसंगी अतुल विद्या मंदिर संस्थेचे कोषाध्यक्ष मा. परिक्षीत भाऊ जगताप, अतुल जगताप माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रदीप तळोकार राजर्षी शाहू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक श्री.कुणाल सिंगलवार व भगत मॅडम उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे