राजर्षी शाहु सायन्स कॉलेज येथे करिअर संसद स्थापना आणि शपथविधी संपन्न

राजर्षी शाहु सायन्स कॉलेज येथे करिअर संसद स्थापना आणि शपथविधी संपन्न

MB-NEWS(चांदुर रेल्वे) – राजर्षी शाहू सायन्स कॉलेज चांदुररेल्वे येथे आज दिनांक १५ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित उपक्रम करिअर कट्टा या उपक्रमाअंतर्गत आज महाविद्यालयामध्ये विद्यार्थी करिअर संसद स्थापना आणि शपथविधी कार्यक्रम उत्साहात पार पडला.महाराष्ट्रातील युवकांचा सर्वांगीण विकास आणि त्याकरिता आवश्यक असणारे माध्यमे युवकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे,नाहीतर आजच्या युवकांमध्ये प्रचंड क्षमता असताना सुद्धा कौशल्या अभावी विविध संधींना मुकावे लागते असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर.वडनेरकर सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. सोबतच त्यांनी कौशल्याची सध्य स्थितीतील असणारी आवश्यकता आणि आजच्या तरुणाईने त्यादिशेने करावयाचे प्रयत्न कसे उपयोगाचे ठरतील याविषयी मार्गदर्शन केले.१५ जुलै हा सर्वत्र जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि या दिनाचे औचित्य साधून करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थ्यानुरूप चालणारा उपक्रम विद्यार्थी करिअर संसद स्थापना आणि शपथविधी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

या विद्यार्थी करिअर संसद मधी विविध पदांवर पदाधिकारी यांची नेमणूक करण्यात येते. यावर्षी एकूण 15 विद्यार्थ्यांची करिअर संसद महाविद्यालयात स्थापन करण्यात आली. यामध्ये मुख्यमंत्री पदी सानिया शेख,नियोजन मंत्री पदी साक्षी जिचकार,कायदे व शिस्त पालन मंत्री पदी प्रतीक्षा पाटणे,सामान्य प्रशासन मंत्री पदी आस्था गांजरे,माहिती व प्रसारण मंत्री पदी प्रथमेश बोदडे,संसदीय कामकाज मंत्री पदी धनश्री गाढवे,उद्योजकता विकास मंत्री पदी प्रज्ञा जाधव,रोजगार व स्वयंरोजगार पदी गौरी सोळंके,कौशल्य विकास मंत्री पदी वैष्णवी काळमेघ,महिला व बाल कल्याण मंत्री श्रावणी नाताळ,सदस्य पदी धरती चकुळे, कोमल बकाले,समीक्षा विठोले आणि अनंत शेलोकार यांची निवड करण्यात आली असून सर्वांचे यथोचित स्वागत मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र,करिअरची डायरी आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले आणि सर्वांचा शपथविधी थाटात संपन्न झाला.या उपक्रमांतर्गत विविध कला विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अवगत करायला शिकतात.

सत्र २०२४ २५ मधील करिअर संसदेच्या कार्याचा आढावा सर्वांपर्यंत पोहोचवावा याकरिता विद्यार्थ्यांनी संपूर्ण वर्षातील उपक्रमांचा व्हिडिओ या कार्यक्रमात सादर केला.महत्वाचे म्हणजे जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून बारामती येथे एक महिन्याचे प्रशिक्षण घेऊन आलेला विद्यार्थी प्रणय दुर्योधन याने बारामती येथील मिलेट्स या क्षेत्रातील माहिती विद्यार्थ्यांना दिली.यानंतर मागील वर्षातील करिअर संसदेतील विद्यार्थी यांचे स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून प्रा.वाणी सर IQAC समन्वयक लाभलेले असून त्यांनी उद्घाटनप्रसंगी उद्बोधनपर भाष्य केले.सोबतच व्यासपीठावर जिल्हा नियोजन समिती अमरावती विभागीय समन्वयक सानिया शेख आणि प्रणय दुर्योधन उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.ममता पळसपगार,करिअर कट्टा समन्वयक यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी धरती चकुळे हिने केले तर आभार प्रतीक्षा पाटणे हिने मानले.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली तर सांगता राष्ट्रगीताने.सर्व प्राध्यापक वृंद आणि कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी वर्ग यांच्या सहकार्याने कार्यक्रम नियोजित वेळात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रा.ममता पळसपगार,करिअर संसदेचे विद्यार्थी आणि जिल्हा नियोजन समितीच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे