Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

बेलोरा विमानतळासंदर्भात केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री.मुरलीधरजी मोहोळ यांच्यासोबत आमदार श्री.प्रतापदादा अडसड यांची बैठक.

बेलोरा विमानतळासंदर्भात केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री.मुरलीधरजी मोहोळ यांच्यासोबत आमदार श्री.प्रतापदादा अडसड यांची बैठक.

MB NEWS (नवी दिल्ली)-:भारतीय जनता युवा मोर्चातील सहकारी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री.मुरलीधरजी मोहोळ यांची दिल्ली येथे आमदार प्रतापदादा अडसड यांनी भेट घेतली. यावेळी बेलोरा अमरावती विमानतळा संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी बेलोरा विमानतळ येथे उभारण्यात येणाऱ्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या पायलट प्रशिक्षण केंद्रासंदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली. आमदार प्रतापदादा अडसड यांनी स्थानिक ग्रामस्थांना रोजगार निर्मिती करिता प्रथमतः प्राधान्य देण्यात येण्यासंदर्भात यावेळी मागणी केली व सोबतच सहकार विभागातील विविध विषयासंदर्भात चर्चा केली. यावेळी श्री.मुरलीधरजी मोहोळ यांनी आमदार प्रतापदादा अडसड यांचे स्वागत केले व युवा मोर्चातील अनेक जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे