भावी मतदार विद्यार्थ्यानी घेतला निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव ;मांजरखेड येथे शालेय निवडणूक संपन्न

भावी मतदार विद्यार्थ्यानी घेतला निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव ;मांजरखेड येथे शालेय निवडणूक संपन्न.

MB NEWS (चांदुर रेल्वे) :-तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या पू. संत गाडगे बाबा विद्यालय व क. म. वि. मांजरखेड कसबा येथे शालेय निवडणूक पार पडली. पु.संत गाडगेबाबा विद्यालय व क. म. वि. मांजरखेड (कसबा) येथील प्राचार्य यु. आर. ढगे सर यांना शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे मंत्रिमंडळ प्रत्यक्ष निवडणुकी मार्फत स्थापन करण्याची नाविन्यपूर्ण कल्पना सुचली. त्या अनुषंगाने त्यांना क.म.वि.चे प्रा. डॉ.प्रवीण राऊत, प्रा .डॉ.विशाल रोटे,प्रा . विपुल बेलसरे सर व चेतन काळे सर यांनी विशेष मदत केली . गाभा घटकांमध्ये सांगितल्याप्रमाणे, विद्यार्थ्याला आपल्या संविधानिक जबाबदाऱ्या समजाव्या या उद्देशाने व जबाबदार नागरिक निर्माण होण्याच्या दृष्टीने एक चांगला उपक्रम शाळेमध्ये राबविण्यात आला. त्याचे नाव होते प्रत्यक्ष निवडणुकीमार्फत विद्यार्थी प्रतिनिधींची निवडणूक. ही निवडणूक 11 ऑगस्टला शाळेच्या प्रांगणामध्ये पार पडली.

आपला भारत एक लोकशाही राष्ट्र आहे, व ही लोकशाही टिकविण्यासाठी विविध स्तरांवरील निवडणुकींना अतिशय महत्त्व आहे. मतदारांनी आपली सद्सदविवेक बुद्धी जागृत ठेवून देशाच्या हिताच्या दृष्टीने योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे. हे आपले कर्तव्य आहे, हे मुलांच्या मनावर बिंबविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी त्यांना निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया माहीत असावी यासाठी निवडणूक हा उपक्रम शाळेत राबविला गेला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची जबाबदारी क.म.वि.चे प्रा.डॉ.विशाल रोटे सर व माध्यमिक मधून श्री. चेतन काळे सर, प्रा.रोहीत पवार सर यांनी उत्कृष्टपणे पार पाडली. शाळेमध्ये वर्ग ५ ते १२ पर्यंत वर्ग असल्यामुळे एकूण १२ वर्ग प्रतिनिधी निवडण्यासाठी निवडणूक झाली. त्यासाठी वेळापत्रक तयार करून, त्यामध्ये अर्ज सादर करणे, अर्ज माघारी घेण्याचा दिवस, ठरविला गेला. त्यानंतर प्रत्येक उमेदवारास निवडणूक चिन्ह दिले गेले.त्यांना आचारसंहिता घालून दिली. मतदार विद्यार्थ्यांची मतदार यादी तयार करण्यात आली. त्यानंतर मधल्या सुट्टीत व शाळा सुटताना प्रचार करण्याची संधी त्यांना दिली. उमेदवार विद्यार्थ्याला जाहीरनामा सादर करण्यास लावला. प्रचार समाप्तीची तारीख ठरविली गेली. व प्रत्यक्ष निवडणुकीची तयारी सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केली. मतपेटी तयार करणे, मतदान कक्ष बनवणे, मतदानाच्या बुथ तयार करणे इत्यादी कामे विद्यार्थ्यांनी केली. मतदान अधिकारी 1, 2 व 3 विद्यार्थ्यांनीच बनवले. मतदाराच्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेत हजर राहायला सांगून शिस्तीमध्ये त्यांचे गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेतले. तसेच केंद्रप्रमुख सहारे सर यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष मतदान व निवडणूक पद्धत या संदर्भात चर्चा केली. त्यानंतर पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केल्या गेली. निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पडण्यासाठी
माध्यमिक व उच्च माध्यमिकचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे