Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

राष्ट्रीय युवक दिनानिमित्त “रन फॉर स्वदेशी” धावण्याची स्पर्धा उत्साहात संपन्न

राष्ट्रीय युवक दिनानिमित्त “रन फॉर स्वदेशी” धावण्याची स्पर्धा उत्साहात संपन्न

MB NEWS (महाराष्ट्रातील बातमीपत्र)-राजश्री शाहू सायन्स कॉलेज, चांदूर रेल्वे येथील NCC विभाग व इक्वल ऑपर्च्युनिटी सेल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद जयंती निमित्त दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी “Run For Swadeshi” या एक किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच NCC कॅडेट्स यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. वडनेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. NCC विभागाचे संयोजक डॉ. संगपाल पाढेन, व इक्वल ऑपर्च्युनिटी सेलचे संयोजक डॉ. पी. आर. सरदार यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले.
समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. पी. आर. वडनेरकर यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण होते, असे मत व्यक्त करून सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे तसेच कार्यक्रम संयोजकांचे अभिनंदन केले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे