Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा जागर : पात्रीकर कॉलनीत कुणबी समाज मेळावा व व्याख्यान सेवा कार्यक्रम संपन्न

संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा जागर : पात्रीकर कॉलनीत कुणबी समाज मेळावा व व्याख्यान सेवा कार्यक्रम संपन्न

MB NEWS ( महाराष्ट्रातील बातमीपत्र)चांदूर रेल्वे-
येथील पात्रीकर कॉलनी सभागृह मंदिरात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सकल कुणबी उद्योग व सामाजिक संस्था, चांदूर रेल्वे यांच्या वतीने कुणबी समाज मेळावा व व्याख्यान सेवा कार्यक्रमाचे आयोजन २३ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले होते. समाजातील एकोपा, संस्कार आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रसार हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश जगताप होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कुणबी समाज मेळावा उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भावे, विश्वास धावडे तसेच आयोजन समितीतील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. मेळाव्यात संत तुकाराम महाराजांच्या अभंगांतील सामाजिक समता, कष्टाचे महत्त्व व नैतिक मूल्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.या कुणबी समाज मेळाव्यास परिसरातील समाजबांधव, ज्येष्ठ नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी आयोजकांच्या वतीने उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे