चांदुर रेल्वे येथे महर्षी सुदर्शन महाराज जयंती उत्सव मोठया  थाटामाटात संपन्न…

चांदुर रेल्वे येथे महर्षी सुदर्शन महाराज जयंती उत्सव मोठया थाटामाटात संपन्न…

MB-NEWS (चांदुर रेल्वे):-  चांदुर रेल्वे शहरातील मेहतर समाजा तर्फे मोठया थाटामाटात महर्षी सुदर्शन जयंती उत्सव संपन्न मेहतर समाजातर्फे जयंती निमित्त समाजप्रबोधनपर कार्यक्रम व भव्य शोभा यात्रेचे नियोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात  युवा कार्यकर्ता मनीष कनोजे  यांच्या तर्फे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यात आले व कार्यक्रमाचे मार्गदर्शक ऍड.किर्ती राहूल इमले यांनी उपस्थित समाजाला शैक्षणिक व कायदेविषयक मार्गदर्शन केले यावेळी प्रत्येक महिलांनी हातात झाडू घेऊन ज्याप्रमाणे गावाला स्वच्छ करता त्याच प्रमाणे हातात पेन घेऊन आपले भवितव्य उज्वल करावे असा सामाजिक संदेश दिला सोबतच नुसता लाडपागे चा वापर करून सफाई कामगार पुरताच मर्यादित न राहता शैक्षणिक पात्रता उंचावून पदोन्नती प्राप्त करणारे जितेंद्र करसे विजय इमले व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे उच्च पदावर नियुक्त होणारे अमर इमले व समाजातील पहिले अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करणारे तुषार कनोजे ,आनंद करसे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देऊन गौरविण्यात आले व यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश इमले व आभारप्रदर्शन भारत करसे यांनी केले व कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता बबलू इमले,अनिल इमले, राहुल रमेश इमले,जितेंद्र करसे, बंटी इमले,अमर इमले,रोशन समूद,सोनू कनोजे,अक्षय करसे संग्राम इमले,विक्की मोगरे,पंकज इमले, रवी इमले,रमेश इमले,सचिन इमले, राजा ईमले, प्रताप इमले,राजु समुद्र, नितीन इमले,नरेंद्र करसे,प्रदीप इमले,रमेश इमले,गोलू करसे,प्रदीप इमले, विजय कनोजे, संदीप इमले,विजय इमले, रवी सातपुते, अंशू कनोजे ,उमेश मेहेडिया कमल जरेले,रोमु करसे ,सुरेश इमले दीपक शेंद्रे,गोलु करसे, रोहित इमले  यांनी प्रयत्न केले तसेच यावेळी मोठया संख्येने मेहतर समाजातील जेष्ठ मंडळी महिला वर्ग नवयुवक उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे