Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी…! दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत मोठा बदल; होम सेंटर रद्द, वाढीव वेळही मिळणार नाही…

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी…! दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत मोठा बदल; होम सेंटर रद्द, वाढीव वेळही मिळणार नाही…

आगामी दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत मोठा बदल करण्यात आला असून, औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने याबाबत माहिती दिली आहे. कारण फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेले होमसेंटर सुविधा आणि पेपर लिहिण्यासाठी दिलेला अर्धा तासाचा वाढीव वेळ रद्द करण्यात आला असल्याची माहिती, विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव वाय. एस. दाभाडे यांनी सांगितले.

असा झाला बदल…

▪️ 2023 मध्ये पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होईल.
▪️ यंदा होणाऱ्या परीक्षेत होम सेंटर राहणार नाही.
▪️ तसेच 80 गुणांच्या पेपरसाठी दिलेला वाढीव अर्धा तास यावेळी मिळणार नाही.
▪️ 60-40 गुणांसाठी असलेली अधिकची पंधरा मिनिटांची सवलत यंदा होणाऱ्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळणार नाही.
▪️ यंदा शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होईल. ( गेल्यावेळी 25% अभ्यासक्रम वगळला होता)
▪️ मात्र, दिव्यांगांना मिळणारी सवलत कायम राहणार आहे.

यामुळे देण्यात आली होती सवलत…

कोरोनाकाळात विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना काहीप्रमाणात दिलासा देण्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते. ज्यात परीक्षेत होम सेंटर देण्याचा निर्णय घेतला गेला होता. तर सोबतच 80 गुणांच्या पेपरसाठी वाढीव अर्धा तास देखील देण्यात आला होता. मात्र आता कोरोना परिस्थिती आटोक्यात असल्याने आगामी दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी वरील निर्णय रद्द करण्यात आले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे