Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

मूग,उडीद आणि सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन,जिल्हा मार्केटिंग कार्यालयामार्फत चांदुररेल्वे, दर्यापूर, धारणी, तिवसा, अचलपूर येथे खरेदी विक्री संघामार्फत…

मूग,उडीद आणि सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन,जिल्हा मार्केटिंग कार्यालयामार्फत चांदुररेल्वे, दर्यापूर, धारणी, तिवसा, अचलपूर येथे खरेदी विक्री संघामार्फत…

MB-NEWS(अमरावती ): -केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत नाफेडमार्फत हंगाम 2022-23 मध्ये मूग, उडीद आणि सोयाबीनसाठी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी खरेदी सुरू करण्यात आली आहे. यासाठी मूग 7 हजार 755 रूपये, उडीद 6 हजार 600 रूपये व सोयाबीन 4 हजार 300 रूपये प्रती क्विंटल भाव शासनाने निश्चित केले आहेत.

नोंदणीसाठी हंगाम 2022-23 मधील पीक पेरा नोंद असलेल्या तलाठ्याचे सही, शिक्क्यानिशी ऑनलाइन सात-बारा, आधारकार्डची छायांकित प्रत, बँक पासबुक छायांकित प्रत सोबत आणावी. बँक पासबुकवर शेतकऱ्यांचे पूर्ण नाव, खाते क्रमांक, आय. एफ. एस. सी. कोड स्पष्ट नमुद असावा. यामध्ये जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये. जिल्हा मार्केटिंग कार्यालयामार्फत चांदुररेल्वे, दर्यापूर, धारणी, तिवसा, अचलपूर येथे खरेदी विक्री संघामार्फत तसेच अचलपूर येथे जयसिंग विविध कार्यकारी सहकारी सोसायटी पथ्रोट व नेरपिंगळाई विविध कार्यकारी सहकारी सोसायटी नेरपिंगळाई मार्फत नोंदणी सुरू आहे.

वरील केंद्राच्या ठिकाणी मूग, उडीद, सोयाबीन हमी भावाने खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे