Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

आम्ही शेतकऱ्यांसोबत… या मथड्याखाली…अ.भा किसान सभेचे तहसील वर धरणे आंदोलन.

आम्ही शेतकऱ्यांसोबत… या मथड्याखाली…अ.भा किसान सभेचे तहसील वर धरणे आंदोलन.

MB-NEWS (पवन ठाकरे,नांदगाव खंडेश्वर):-नांदगाव खंडेश्वर:- आखिल भारतीय किसान सभेच्या राज्य केंद्राने दिलेल्या राज्यव्यापी धरणे आंदोलनाची भूमिका घेण्यात आली त्याचाच भाग म्हणून तहसील कार्यालय नांदगाव खंडेश्वर दि.23 नोव्हेंबर 2022 किसान सभेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

राज्यात झालेल्या प्रचंड अतिवृष्टीचा मोठा परिणाम शेतकऱ्यांच्या दैनंदिन जगण्यावर झाला त्याच सोबत शेतकऱ्यांच्या आत्महत्या मध्ये सुद्धा वाढ झाल्याचे दिसत आहे आत्महत्या पर्याय नसून लढा शेतकऱ्यांनी केला पाहिजे व केद्र सरकार चा शेतकरी विरोधी, कामगार विरोधी व जन निरोगी धोरणाच्या विरोधात देश भर आंदोलनाची हाक देण्यात आली 26 नोव्हेंबर संविधान चौकात होणाऱ्या आंदोलनामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे असे यावेळी आवाहन आंदोलनातून करण्यात आले. आंदोलनाच्या मागण्या: राज्य सरकारने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा, पीक कर्जमाफी करणे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना 50, हजार एकरी मदत द्यावी, विम्याची अग्रीम रक्कम देण्यात यावी, अतिवृष्टीचे मूल्यमापन करताना प्रत्येक गावाचा एक ब्लॉक गृहीत धरून एक ब्लॉक, एक गाव करावा, शेतकरी लाभार्थी प्राधान्य कुटुंबाचा राशन धान्य पुरवठा पूर्ववत सुरू करावा, तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांनी गायरान ची जमीन अतिक्रमित केली आहे ती त्यांची नावे करावी, अतिवृष्टीमुळे खराब झालेले पांदण रस्ते दुरुस्त करावे, शेतकऱ्यांच्या शेतातून चोरी गेलेले रोहित्र व विद्युत तारा लावून विद्युत पुरवठा सुरळीत करा, शेतकऱ्यांना रब्बी हंगामा करता वीजपुरवठा दिवसा करा, नांदगाव शहरातील शेतकरी शेती योजनेपासून गेल्या 8 वर्षापासून वंचित आहे त्यांना शेती योजनेचा लाभ द्या, राशन दुकानातून गव्हाचा पुरवठा पूर्ववत सुरू करा, कडाक्याच्या थंडीत 54 दिवसापासून उपोषण करणाऱ्या सफाई कामगारांना कामावर घेण्यात यावे, आदिवासीच्या जमिनी मूळ मालक असणारे आदिवासी बांधव यांच्या नावे करण्यात यावे, आंदोलनाचे नेतृत्व किसान सभा जिल्हा सचिव श्याम शिंदे, तालुकाध्यक्ष अनिल मारोटकर, तालुका सचिव दिलीप महल्ले, अशोक केसरखाने यांनी केले. धरणे आंदोलनात विजय पाटील, दिनेश बावणे, राहुल मोहोळ, प्रभाकर सुने, ज्ञानेश्वर शिंदे, ज्ञानेश्वर पाटमासे, शंकर वाठोडकर, अंकेश खंडारे, शिवदास उईके, बापूराव रोकडे, ज्ञानेश्वर खडसे, देविदास खडसे, निर्मला आगासे, लंका राऊत, रेखाबाई झिमटे, शाकीर भाई, राजू ढोके, शंकर सुने, कानतेश्वर पुंड, मधुकर कांबळे, गजानन कांबळे, यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे