Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

25 पासून तालुक्यात क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव सुयश बहुद्देशीय संस्थेचे आयोजन ; नगराध्यक्ष चषक

25 पासून तालुक्यात क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव
सुयश बहुद्देशीय संस्थेचे आयोजन ; नगराध्यक्ष चषक

MB-NEWS (चांदुर रेल्वे) :- जिल्ह्यातील व तालुक्यातील क्रीडापटू व कलावंतांना हक्काचे रंगमंच मिळावा व त्यांना आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवता यावा यासाठी सुयश बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुमेध सरदार यांनी 25 ते 27 नोव्हेंबर रोजी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे, विजेत्या चमुंना नगराध्यक्ष चषक यावेळी देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेने पत्रकार परिषदेत दिली.

मागील 12 वर्षापासून संस्थे मार्फत क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव तसेच रक्तदान शिबिराचे कार्यक्रम घेतल्या जात आहे . खेळाडूंना व कलावंतांना एक व्यासपीठ ,मैदान देऊन त्यांच्याकडे सुप्त गुणांना वाव देण्याकरिता ह्या स्पर्धा घेतल्या जात असून त्याकरिता तालुक्यातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद व उत्साह असलयाचे सुमेध सरदार यांनी सांगितले, स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल च्या मैदानावर आयोजित या महोत्सवामध्ये दि 25 ला कबड्डी स्पर्धा, दि 26 ला क्रिकेट मॅचेस, व 27 ला एकल नृत्य स्पर्धा या महोत्सव अंतर्गत होणार आहे, प्रत्येक स्पर्धेसाठी स्वतंत्र रित्या बक्षिसे देण्यात येणार असून यासह अनेक वयक्तिक बक्षिसे या स्पर्धेसाठी ठेवण्यात आल्याचेही आयोजकांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी, सुमेध सरदार, शेहजाद सौदागर, रुपेश पुडके, अमोल ठाकरे, गुड्डू वानखडे, प्रफुल मकेश्वर, सुरज आठवले, गोलू दाभाडे आदी उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे