Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

सुयश बहुउद्देशीय संस्थेचा वतीने क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ शिट्टूदादा सूर्यवंशी चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न…

सुयश बहुउद्देशीय संस्थेचा वतीने क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ शिट्टूदादा सूर्यवंशी चषक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न…

MB-NEWS (चांदुर रेल्वे ):-सुयश बहुउद्देशीय संस्थेचा वतीने क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ शिट्टू दादा सूर्यवंशी चषक आयोजित केले. यामध्ये उद्द्घाटन मा.श्री.वीरेंद्र भाऊ जगताप माजी आमदार यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष निलेश सूर्यवंशी, अमोल होले, निवास सूर्यवंशी, प्रभाकरजी वाघ सर,देवानंद खुणे होते. 3दिवसीय कार्यक्रम घेण्यात आले होते.

त्यामध्ये एकदिवसीय कबड्डी स्पर्धेत 17 कबड्डी संघांनी सहभाग घेऊन प्रथम बक्षीस आझाद क्रीडा मंडळ अमरावती द्वितीय बक्षीस आझाद हिंद क्रीडा मंडळ चांदुर रेल्वे तृतीय बक्षीस जय गुरुदेव मंडळ निमगव्हाण यांना मिळाली दिनांक 26 तारखेला भव्य रक्तदान शिबिर त्या शिबिरामध्ये संविधान दिन व 26/ 11 नोव्हेंबर झालेल्या हल्ल्यामध्ये शहिदांना आत्म समर्पित करून 38 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यामध्ये सुनील किंगने ठाणेदार साहेब यांच्यासह पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला दोन दिवशीय क्रिकेट स्पर्धेमध्ये 16 क्रिकेट टीम सहभाग नोंदविला होता. त्यापैकी प्रथम क्रमांक बक्षीस मॉर्निंग क्रिकेट क्लब चांदूर रेल्वे द्वितीय क्रमांक बक्षीस जय हिंद बिल्डिंग मटेरियल चांदुर रेल्वे तृतीय बक्षीस प्रोफेशनल इलेव्हन अमरावती यांनी पटकाविले नृत्य स्पर्धेमध्ये 40 स्पर्धकांनी सहभाग घेऊन प्रथम क्रमांकाचे बक्षीस किमया सरकटे अमरावती व राघिनी ठाकरे वर्धा दुतीय बक्षीस आकाश तायडे नागपूर सुरज धनुष्कार धामणगाव रेल्वे चौथ्या क्रमांकाचे बक्षीस ईशा वानखडे चांदूर रेल्वे पाचवा क्रमांक दीपाशिका सावरकर अमरावती प्रोत्साहन पर बक्षीस पायल गवई अमरावती यांना देण्यात आले.

बक्षीस देताना माजी निलेश उर्फ शिट्टू सूर्यवंशी, परीक्षीत जगताप संस्थेचे अध्यक्ष सुमेद सरदार ,आर्यन सर, वैशाली भगत, मोनू सरदार, शेहजाद सौदागर ,रुपेश पुडके ,प्रकाश वानखडे ,भीमा पवार ,अनिस सौदागर नवीन तिखे, गजू चोरे ,अमोल ठाकरे, विलास मोटघरे ,भूषण सरदार, सागर बगेकर ,कैलास पवार, प्रफुल मकेश्वर ,बबन वानखडे, मनोज गवई ,आदींच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे