Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

स्कॉलर्स कॉन्व्हेंट, सी बी एस ई मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा

स्कॉलर्स कॉन्व्हेंट, सी बी एस ई मध्ये संविधान दिवस उत्साहात साजरा…

(अमरावती):-  २६ नोव्हेंबर संविधान दिवस अमरावतीच्या दसरा मैदान येथील स्कॉलर्स कॉन्व्हेंट, सी बी एस ई मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री अय्यंगर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण व पूजन करण्यात आलं. त्यानंतर कु. कस्तुरी शिंदे, पूर्वा मोहोड, नमन पोची व स्वरा देशमुख यांनी संविधान दिनाचे महत्व सांगून आपले मनोगत व्यक्त केले.

 

संविधानाचे महत्व नागरिकांमध्ये जागृत करण्यासाठी शाळेच्या वतीनं रॅलीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. कु. जाहरा बोहरी या विद्यार्थिनीने व सर्व शिक्षिकांनी भारतीय संविधानाचे जतन करण्याची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वर्ग ६ ची विद्यार्थिनी कु. समीरा कुबडे हिने केले असून संविधान दिनाचा कार्यक्रम प्रतिभा उ. तुपाडे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आला होता. तसेच सपना कटरे यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे