Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार ‘बि-बियाणे, खत-औषधे व कीटकनाशके’….

शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार ‘बि-बियाणे, खत-औषधे व कीटकनाशके’….

👉 देश भरातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बि-बियाणे, खत-औषधे, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना आता कृषी सेवा केंद्रा समोर तास न् तास रांगा लावाव्या लागणार नाही. मोदी सरकारने ई-कॉमर्स वेबसाइटच्या माध्यमातून कीटकनाशकांच्या विक्रीला परवानगी दिली आहे.

▪️ अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टसह विविध ई-कॉमर्स कंपन्यांद्वारे आता ऑनलाईन कीटकनाशकांची विक्री केली जाणार आहे. त्यासाठी कृषी मंत्रालयाने कीटकनाशक नियम 1971 मध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. सरकारने कीटकनाशक विक्रीच्या नियमात बदल करीत, ई-कॉमर्स वेबसाइटच्या माध्यमातून कीटकनाशकांच्या विक्रीला कायदेशीर मान्यता दिली आहे.

▪️ गेल्या अनेक दिवसांपासून थेट शेतकऱ्यांच्या दारात कीटकनाशके पोहोचावीत, तशी परवानगी कंपन्यांना मिळावी, अशी मागणी होत होती. अखेर कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या मागणीला यश आलं आहे. सरकारच्या निर्णयामुळे कीटकनाशक उत्पादक कंपन्या व कृषी क्षेत्राशी संबंधित व्यवसायाचा विस्तार होण्यास मदत होईल, असे कंपन्यांचं म्हणणं आहे.

▪️ देशातील विविध ई-कॉमर्स वेबसाइटवर आता कीटकनाशके उपलब्ध होणार असून, शेतकऱ्यांना त्यासाठी फारसा वेळ व पैसा खर्च करावा लागणार नाही. शिवाय, विनाकारण कृषी दुकानांमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. ऑनलाइन ऑर्डर देऊन कीटकनाशकांची होम डिलिव्हरी मिळवू शकतील.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे