अमरावती । पाण्याच्या टाकीत आढळला युवतीचा मृतदेह

अमरावती । पाण्याच्या टाकीत आढळला युवतीचा मृतदेह

अमरावती :-घराच्या पाण्याच्या टाकीत २८ वर्षीय युवतीचा मृतदेह संशयास्पदपणे आढळून आला. अश्विनी गुणवंत खांडेकर हि युवती गेल्या २५ नोव्हेंबर पासून बेपत्ता होती. तशी या युवतीच्या मिसिंग ची तक्रार गाडगेनगर ठाण्यात दाखल देखील होती. मात्र घरच्याच पाण्याच्या टाकीत युवतीचा मृतदेह आढळून आल्याने आता परिसरात खळबळ उडाली आहे. सदर मृत युवती हि रत्नदीप कॉलनी, अर्जुन नगर येथील रहिवाशी होती. घटनास्थळी ए सी पी पाटिल सह गाडगे नगर पोलीस दाखल झाले असून श्वान पथक सह फींगर प्रिंट पथक देखील बोलावण्यात आलं आहे. घटनास्थळी नागरिकांनी केली गर्दी असून घटनेचा तपास गाडगेनगर पोलीस करीत आहेत.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे