Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

आरोग्य विभागाच्या पदावरून तुकाराम मुंढे यांना हटवल्याने राष्ट्रवादी आक्रमक… जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य मंत्र्या समोर जोरदार राडा. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विचारला आरोग्यमंत्र्यांना जाब.

आरोग्य विभागाच्या पदावरून तुकाराम मुंढे यांना हटवल्याने राष्ट्रवादी आक्रमक…
जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य मंत्र्या समोर जोरदार राडा.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विचारला आरोग्यमंत्र्यांना जाब.

MB-NEWS(अमरावती)  :-आरोग्य विभागाच्या पदावरून सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना हटवल्याने राष्ट्रवादी शहर व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते अमरावतीत चांगलेच आक्रमक झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या समोर जोरदार नारेबाजी करीत सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची बदली रद्द करण्याची मागणी करण्यात आली. सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य मंत्र्या समोर राष्टवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केला . आरोग्य विभागाच्या पदावरून सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांना का हटविले ,याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरोग्यमंत्र्यांना जाब विचारला . तुकाराम मुंढे यांची बदली केल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्तेनी संतप्त होऊन राष्ट्रवादी काँग्रेस कडून शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध केला . तसेच तुकाराम मुंढे यांची बदली रद्द झालीच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली . राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून हातात फलक घेऊन आरोग्यमंत्र्यांचा विरोधही यावेळी करण्यात आला . तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करून तातडीने त्यांना आरोग्य विभागात रुजू करा अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीने रेटून धरण्यात आली . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष-प्रशांत डवरे,मनपाच्या स्थायी समितीचे माजी सभापती-अविनाश मार्डीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी-वाहिद खान,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष-ऋतुराज राऊत, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष-आकाश हिवसे,के.एम. अहमद,आनंद मिश्रा, अशोकराव हजारे,ऍड. सुनील बोळे, प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे,प्रमोद महल्ले,राजेंद्र खोरगडे, संजय बोबडे, विशाल तायडे, मनोहर रहाटे,किशोर देशमुख, किशोर भुयार, संजय कुकरेजा, पप्पूसेठ खत्री, अमोल देशमुख, चेतन सुरेश चौधरी, दीपक यादव,मनीष बजाज,डॉ. सुधाकर काळमेघ,वाठोडकर,रवींद्र घवळे,माजी नगरसेवक-भूषण बनसोड, धनराज चौके ,रघुनाथ पवार, गणेश तंबोले, संजय ढेनवाल, बबनराव चव्हाण, दिपकराव होले, बंडू निंभोरकर,संजय महाजन,विष्णुपंत काम्बे, अविनाश बोबडे,सतीश राऊत गुरुजी,दिग्विजय गायगोले, जयेश सोनोने, अभिजित लोयटे, अक्षय पळसकर, संकेत बोके, अभिषेक बोळे, मनीष पाटील,सचिन बुंदेले, डॉ. करीमभाई शाह, अब्दुल सत्तार राराणी, अब्दुल नईम चुडीवाले, अफसर बेग, जुममा हसन नंदावाले, दिलबर शाह,साडीकभाई कुरेशी, मोहमद शाहजहान कुरेशी, नादिममुलला सर,रेहान उज्जजमा,सनाउल्लाह सर, डॉ. एजाज खान,आदिसहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सदस्य व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे