Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

हार जित पेक्षा खेळणे महत्वाचे सभापती प्रशांत भेंडे ; जी.प.क्रीडा स्पर्धा

हार जित पेक्षा खेळणे महत्वाचे
सभापती प्रशांत भेंडे ; जी.प.क्रीडा स्पर्धा

MB-NEWS (चांदुर रेल्वे) :- जीवनात अनेक स्पर्धा असतात त्यात हार जित होत राहते परंतु हार जित ला महत्व न देता खेळत राहणे हे महत्वाचे असते खेळाने शरीर आणि मन समृद्ध राहते असे प्रतिपादन प स सभापती प्रशांत भेंडे यांनी केले
जिल्हा परिषद शिक्षण विभागाद्वारे आयोजित तालुका केंद्रस्तरिय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

धनोडी, घुईखेड केंद्राचे केंद्रस्तरिय क्रीडा स्पर्धेचे आयोजन बग्गी येथील संत मानिराम महाराज माध्यमिक शाळेमध्ये करण्यात आले होते त्यावेळी आयोजित कार्यक्रमाला त्यांच्यासह सरपंच विजया चव्हाळे, उपसरपंच सोनाली दांडगे, उद्योगपती रोशन पाटील, प्रकाश चव्हाळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय मेश्राम, केंद्रप्रमुख प्रदीप गायकवाड, रेखा माळी, विषय साधन व्यक्ती विवेक राऊत, विशेष शिक्षक मंगेश उल्हे, मंगेश बोरीकर, श्रीकृष्ण हिवराळे, संत मानिराम शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण केचे, जीप बग्गी शाळेचे राजेंद्र तामस्कर आदी उपस्थित होते यावेळी तालुक्यातील दोन केंद्रामधील 350 विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांसह उपस्थित होते, कबड्डी, खो खो, लंगडी, सह इतर खेळांचे प्राथमिक फेरी आज पार पडल्या, दोन दिवस ह्या क्रीडा स्पर्धा चालणार असून यात विजयी झालेल्या चमुंना तालुकास्तरावर खेळावे लागणार आहे. दोन दिवसीय या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी केंद्रातील शिक्षक मुख्याध्यापक परिश्रम घेत आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे