Breaking
लंडनमध्ये चांदूर रेल्वेच्या सुपुत्राची दमदार भरारी! पत्रकार निशिकांत कदम देशमुख यांचे सुपुत्र अभिनव कदम देशमुख यांना सायबर सिक्युरिटीमध्ये गुणवत्तेसह मास्टर्स पदवीमाजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी (गौरी) मातेचे विधिवत पूजन संपन्न ;~सुख-समृद्धीसह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी मातेचरणी साकडेपी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम्युनिकेशन विभागाला बेस्ट आयईआय (IEI) स्टुडंट्स चॅप्टर अवॉर्ड;पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकीचा विशेष सन्मानपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपच्या ‘राजा’ची थाटात स्थापना ;श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या हस्ते विधिवत स्थापना; आ. प्रविण पोटे पाटील यांनी केले मनोभावे पूजनपी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुपतर्फे गणेशोत्सव सजावट स्पर्धा-२०२६ चे आयोजन;संस्थेचे उपाध्यक्ष श्रेयसदादा पोटे पाटील यांच्या वतीने अधिकृत घोषणा

शिवसेनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे जिल्हा कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन,नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित

शिवसेनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे जिल्हा कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन,नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हजारो शेतकरी पीक विम्यापासून वंचित

शेरू भोरू सरकार मुर्दाबाद अश्या घोषणेने परिसर दणाणला

MB-NEWS (अमरावती):-नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हजारो शेतकरी पिक विम्याच्या मदतीपासून वंचित आहे पीक विमा वतापात तफावत असल्याने शेतकऱ्यांनि शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात जिल्हा कृषी अधिकारी अमरावतीच्या कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन करून शेरू भोरू सरकार मुर्दाबादच्या घोषणेने परिसर दणाणून सोडला नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मोजक्याच शेतकऱ्यांना अल्पप्रमानात पीक विमा मिळाला ए आय सि पीक विमा कंपनीने विमा वाटपात प्रचंड दुजाभाव केला काही शेतकऱ्यांना हजारो रुपये विमा मिळाला तर काही शेतकऱ्यांना शंभर रुपये पीक विमा मिळाला दहा हजाराचे वर शेतकऱ्यांच्या तक्रारींवर विमा कंपनीने पाहणी केली नाही रिजेक्ट केलेल्या तक्रारी सुद्धा मान्य कराव्या या मागणीसाठी शिवसेनेने जिल्हा कृषी कार्यालयात धडक देऊन ठिय्या आंदोलन केले दोन तासांनी जिल्हा कृषी अधिकारी खर्चान यांनी संमधीत पीक विमा कंपनीवर कार्यवाही करण्याचे प्रस्तावित करून शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा कसा मिळेल यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल व अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित असलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळावी याकरीता शासनाकडे पाठपुरावा करण्याचे लेखी पत्र दिल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील उपजिल्हाप्रमुख प्रमोद कठाळे तालुका प्रमुख विंष्णू तिरमारे मनदेव चव्हाण सरपंच हेमंत ढेपे श्रीकृष्ण सोळंके रमाकांत मुरादे गुणवन्त चांदूरकर अक्षय राणे विजू चव्हाण मनोज कडू मनोज ढोके पिंटू तुपट चेतन केळकर शरद रुमणे विजू चव्हाण सुमित चौधरी महेंद्र गारोळे इत्यादी शेतकरी उपस्थित होते

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे