तळेगाव ठाकूर येथे श्री दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
MB-NEWS(तळेगाव ठाकूर, सुनील घोडमारे प्रतिनिधी):-श्री दत्त मंदिर श्री क्षेत्र तळेगाव ठाकूर येथे श्री दत्त जन्मोत्सव कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या थाटामाटात करण्यात आले आहे.दत्त जयंती हा हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा होणारा एक शुभ हिंदू सण आहे. दत्त जयंती ही हिंदूधर्मियांचे देव दत्तात्रेय यांची जयंती असून ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्या त्रिकुटाला एकत्रितपणे त्रिमूर्ती म्हणून ओळखले जाते.
भगवान दत्ताची प्रतिमा सामान्यपणे हातात ब्रह्माची जपमाळ आणि पाण्याचे कमंडलू, विष्णूचे शंख आणि चक्र, त्रिशूल आणि शिवाचे डमरू यासारख्या वस्तू धारण करून सहसा तीन डोके आणि सहा हात अशी दर्शविली जाते.
काही हिंदू धर्मग्रंथांमध्ये असेही म्हटले आहे की दत्त भगवान विष्णूचा पुनर्जन्म आहेत. हिंदूंच्या मते, त्यांच्या अवताराच्या दिवशी दत्ताची उपासना केल्याने भक्तांना समृद्ध आणि आनंदी जीवन जगण्यास मदत होते.
तळेगाव ठाकूर येथील दत्त मंदिर अतिशय जागृत ठिकाण ओळखले जाते उंच टेकडीवर असणारे दत्ता मंदिर अनेक प्रकारचे झाडे झुडप्याने तसेच मोकळी शुद्ध हवा आणि मनाला भुरळ पाडणारे वातावरण यामुळे या ठिकाणी दत्त जयंती महोत्सवाला मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे.
श्री दत्त मंदिर श्री शेत्र तळेगाव ठाकूर येथे रविवार दिनांक ४/१२/२०२२ ते गुरुवार दिनांक८/१२/२०२२ पर्यंत दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. या कार्यक्रमांमध्ये रविवार दिनांक ४ ला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन थोर समाज सुधारक या विषयावर समर्थ डोंगरपुरी महाराज संस्थान येथे ग्रीन फाउंडेशन संस्था व दत्त जन्मोत्सव समिती तळेगाव ठाकूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे सोमवार ५ ला सकाळी दहा ते बारा अभिषेक व तीर्थ स्थापना दुपारी गुरुचरित्र सामूहिक पारायण दुपारी एक ते पाच महिला भजन मंगळवार दिनाक ६ ला सकाळी नऊ ते दहा आरती सकाळी 11 ते 12 गुरुचरित्र सामूहिक पारायण दुपारी एक ते पाच भजन बुधवार दिनांक ७ सकाळी नऊ ते दहा आरती सकाळी 11 ते 12 गुरुचरित्र सामायिक पारायण दुपारी एक ते चार सांस्कृतिक कार्यक्रम चार ते पाच बक्षीस वितरण सायंकाळी सहा ते आठ दत्तजन्म पाळणा गीत सादर करते राजूभाऊ पाचकवडे यांच्या हस्ते होणार आहे गुरुवार दिनांक ८ ला सकाळी नऊ ते बारा काल्याचे किर्तन हरिभक्त परायण कैलास महाराज चांदुरकर अमरावती यांच्या मधुर वाणीतून होणार आहे दुपारी बारा ते चार महाप्रसाद होणार आहे याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून दिवसा विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार एडवोकेट यशोमती ताई ठाकूर माजी पालकमंत्री अमरावती जिल्हा उपस्थित राहणार आहे.
दत्त जयंती महोत्सवाला भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे या ठिकाणी दत्ताच्या दर्शनाने आपले भले होते असा विश्वास असल्याने भावी पिढी मोठ्या प्रमाणात येथे गर्दी करतात मंदिराचा जीर्णोद्धार मागील काही दिवसापासून होत असून यामध्ये अनेक नागरिक सहभागी होत आहे मंदिर विकासासाठी शासन स्तरावर मदत व्हावी पर्यायाने या परिसराचा सर्वांगीण विकास घडवून यावा यासाठी वर्गाचा मदतीची गरज असल्याचे मत मंदिर विश्वस्त मंडळींनी केली आहे सदर दत्तजन उत्सव कार्यक्रमासाठी तळेगाव ठाकूर व परिसरातील मंडळी अथक परिश्रम घेत आहे.

