विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खं. येथे नॅकच्या सुधारित मार्गदर्शक तत्वावर एक दिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन.

विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खं. येथे नॅकच्या सुधारित मार्गदर्शक तत्वावर एक दिवसीय कार्यशाळेचे यशस्वी आयोजन.

MB news( पवन ठाकरे,नांदगाव खंडेश्वर):-प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट अमरावती द्वारा संचालित विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथील आयक्यूएसी तर्फे दिनांक ०५ डिसेंबर २०२२ रोजी नॅकच्या सुधारित मार्गदर्शक तत्वावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अलका भिसे, तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून अकोला येथील श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयचे आयक्युएसी समन्वयक प्रा. डॉ. आशिष राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी मंचावर महाविद्यालयाच्या आयक्युएसी समन्वयक डॉ. सुचिता खोडके उपस्थित होत्या. सर्वप्रथम कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. आशिष राऊत यांचे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अलका भिसे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच त्यांच्या आयक्यूएसी समन्वयक कार्यकाळात नुकत्याच पार पडलेल्या नँक समितीच्या भेटी दरम्यान त्यांच्या श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास विदर्भातील सर्वात जास्त (CGPA 3.58) नॅक मानांकन मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदनही केले.
कार्यशाळेच्या संयोजक तथा आयक्युएसी समन्वयक डॉ. सुचिता खोडके यांनी आपल्या प्रास्तावीक पर भाषणात या कार्यशाळेच्या आयोजनाचा उद्देश विशद करून कार्य शाळेला लाभलेले प्रमुख मार्गदर्शक डॉ. आशिष राऊत यांचा परिचय करून दिला.
कार्यशाळेच्या सुरुवातीला प्रा. डॉ. आशिष राऊत यांनी आधीच्या नॅक मॅन्युअल मधील नुकत्याच झालेल्या बदलांबद्दल संक्षिप्त माहिती देत नॅकच्या संपूर्ण मानांकन प्रक्रियेत झालेल्या बदलांबद्दल मार्गदर्शन केले तसेच महाविद्यालयाने नॅक मानांकनासाठी सामोरे जात असताना करावयाची तयारी याबद्दल मार्गदर्शन केले. या दरम्यान त्यांनी प्रत्येक नॅक निकषांप्रमाणे झालेल्या कामाचा आढावा घेत त्या निकषांसंबंधित सदस्यांसोबत येणाऱ्या अडचणींबद्दल चर्चा केली. प्रत्येक निकषाची पूर्तता करण्यासाठी संबंधित आवश्यक कोणकोणते कागदपत्र जोडावेत व कशाप्रकारे दस्ताऐवज तयार करण्यात यावेत याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते वेगवेगळ्या निकषांची जबाबदारी असलेल्या प्राध्यापकांनी डॉ. आशिष राऊत यांच्यासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली तसेच आपल्या समस्यांचेही निरसनही करून घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अलका भिसे यांनी महाविद्यालय नॅक मानांकनासाठी सामोरे जात असतांना त्याची तयारी करण्यासाठी संस्थेचे व्यवस्थापक मंडळातील सर्व पदाधिकारी तथा सदस्य यांचे मार्गदर्शनात व महाविद्यालयातील आयक्युएसी समन्वयक, तसेच महाविद्यालातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने महाविद्यालय आपली नॅकची मानांकन प्रक्रिया यशस्वीपणे पार पडेल असा विश्वास व्यक्त केला. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. गजेंद्रसिंह पचलोरे यांनी केले तर भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अनंत वडतकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे